जुनी पेन्शन मिळणे हा खरतरं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा हक्क आहे. त्यांमुळे प्राथमिक शिक्षकांसह इतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी ,कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्यासंदर्भात ग्रामसभेचा आवश्यक असलेला ठराव या शासननिर्णयात शिथिलता आणावी या मुद्दयांसह वीस पटाच्या आतील शाळा बंद करू नये.त्या शाळांवर सेवानिवृत्त शिक्षकांना मानधनावर नेमणूक करण्यात येऊ नये.अशा प्रश्नांचा विधानसभेत पाठपुरावा करू असे प्रतिपादन आ.दत्तात्रय भरणे यांनी शिक्षक मेळाव्यात केले.
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाने इंदापूर तालुकास्तरीय शिक्षक मेळाव्याचे आयोजन पुणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेच्या नुतन सभागृहात केले होते.
मेळाव्याचे उद्घाटन आ.दत्तात्रय भरण यांनी केले. अध्यक्षस्थान कास्ट्राईब चे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी भूषविले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सुहास मोरे यांनी केले. सूत्रसंचालन सुनील भोसले आणि ज्योती भोसले यांनी केले. आभार प्रदर्शन महिला अध्यक्षा मनीषा ननवरे यांनी मांडले. यावेळी अध्यक्षस्थानी बोलताना राज्याध्यक्ष गौतम कांबळे म्हणाले की शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कास्ट्राईब महासंघ तत्पर आहे राज्यस्तर आणि जिल्हास्तरावरील शिक्षकांच्या प्रश्नाचा पाठपुरावा तातडीने केला जाईल. बदली धोरण राबवण्यासाठी शिक्षक महासंघाने अग्रेसर भूमिका घेतली आहे. अडचणी असलेल्या शिक्षकांचा मुख्य आधार कास्ट्राईब शिक्षक महासंघ बनला आहे. राज्यभर संघटना वेगाने पसरत आहे.
प्रास्ताविकामध्ये तालुकाध्यक्ष सुहास मोरे यांनी शिक्षकांचे प्रश्न मांडले. शिक्षकांकडे सर्वांनी सकारात्मक दृष्टीने बघितले पाहिजे. जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे. मुख्यालयी राहण्यासंदर्भात असलेली ग्रामसभेतल्या च्या ठरावाची अट रद्द झाली पाहिजे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सीसी व्याजदर 9% करण्यात यावा. सीसी चे नूतन नूतनीकरण दर तीन वर्षांनी करण्यात यावे. वीस पटांच्या आतील शाळा बंद करण्यात येऊ नये. सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती वीस पटाच्या आतील शाळावर करण्यात येऊ नये. स्थायित्व विनाअट मिळावे. अशा अनेक मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. मेळाव्यात 35 शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार,८ शिक्षक जोडप्यांना ज्योतिबा सावित्री पुरस्कार,८ जणांना विशेष प्रतिभा संपन्न पुरस्कार देण्यात आले.आ.दत्तात्रय भरणे आणि राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांना महात्मा फुले यांची पगडी घालून सन्मानीत करण्यात आले.मेळाव्यास शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मेळावा यशस्वी करण्यासाठी तालुका कार्यकारिणीने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय ठोंबरे, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष नाना नरूटे, इब्टाचे तालुकाध्यक्ष सहदेव शिंदे ,शिक्षक भारतीचे तालुका अध्यक्ष सतीश शिंदे, शिक्षक संघ शिवाजीराव गटाचे तालुकाध्यक्ष अनिल रुपनवर, नानासाहेब दराडे ,किशोर वाघ, हरिभाऊ तरंगे राज्य महासचिव विठ्ठल सावंत राज्य सल्लागार दिगंबर काळे चंद्रकांत सलवदे, जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण , जिल्हा महासचिव मिलिंद देडगे कृष्णा हेळकर ,बाळकृष्ण खरात तसेच सर्व तालुक्याचे तालुकाध्यक्ष, शिक्षक सोसायटीचे सर्व संचालक उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशिकांत मखरे, सदाशिव रणदिवे, सुधाकर आव्हाड, बालाजी कलवले, रतिलाल कुचेकर ,संभाजी सूर्यवंशी ,सुनील निकम, नितीन रमेश मिसाळ ,नितीन दिलीप मिसाळ ,स्नेहल सोनवणे, आशा सोनवले ,रत्नमाला सरगुले, स्मिता मोरे ,सचिन लोंढे ,सुप्रिया वनकळस, तात्या मसलखांब, सोमनाथ धनवडे,नितीन साबळे भीमराव चंदनशिवे, स्नेहल गायकवाड , दिलीप कांबळे ,अनिल गायकवाड ,संतोष कांबळे, विश्वास पोळ ,विदेश कांबळे अरुण कांबळे, विद्यासागर गायकवाड यांनी परिश्रम घेतले.