सफाळा:( वैभव पाटील :प्रतिनिधी: 9850868663)दि.26 फेब्रुवार सफाळा रेल्वेच्या पूर्वेकडील त्रिमूर्ती विद्यालय माकणे येथे इयत्ता 10 विच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता.त्या वेळी शेतकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा पालघर जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती सुरेश तरे बोलत होते की माणसाने जीवनात सदैव सकारात्मक राहिले पाहिजे. यशाचे शिखर गाठण्यासाठी प्रत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
शेतकरी शिक्षण संस्था संचालित त्रिमूर्ती विद्यालय माकणे या शाळेत इ.10 वी चा निरोप समारंभ नुकताच पार पडला. यावेळी संस्थेचे सचिव परशुराम पाटील गुरुजी, संस्थेचे सदस्य सुरेश घरत, सदानंद तरे,विलास गावड,उपसरपंच तनुजा घरत, उपस्थित होते.यावेळी संस्थेचे सचिव परशुराम पाटील यांनी विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी वेळे आधी पोहचण्याचा सल्ला दिला. या स्पर्धेच्या युगात आपण सदैव जागृत राहिले पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी इतर मान्यवर, शाळेतील शिक्षक यांनी आपली मनोगते व्यक्त केली.त्याचबरोबर विद्यार्थ्यांना भरभरून शुभेच्छा देखील प्रदान केल्या.इ.9 वी व 10 वी च्या विद्यार्थ्यांच्या मनोगतांनी उपस्थित मान्यवरांची मने जिंकली.शाळेची सर्व क्षेत्रात दिवसेंदिवस होत असलेल्या प्रगतीचे सर्वांनी कौतुक केले.शाळेचे मुख्याध्यापक जगदीश किणी यांनी मान्यवरांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. गीता पाटील यांनी तर सूत्रसंचालन मानसी पाटील यांनी केले.या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचारी,व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.