श्री हनुमान विद्यालय अवसरीचे मुख्याध्यापक श्री. प्रवीण लोंढे सर तसेच पुसेगाव जिल्हा सातारा येथील कृषी मंडल अधिकारी श्री. सचिन लोंढे यांच्या आई श्रीमती सुभद्रा वसंत लोंढे यांना आज ज्येष्ठ आदर्श नागरिक सन्मानाने गौरविण्यात आले. अकलूज परिसरातील ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत दिवंगत वसंत लोंढे यांच्या धर्मपत्नी श्रीमती सुभद्रा लोंढे यांनी अतिशय कठीण , हलाखीच्या परिस्थितीत काबाडकष्ट करून मुलावर सुसंस्कार करीत त्यांना उच्च शिक्षण दिले.प्रसंगी उपाशी पोटी राहिल्या परंतु मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवले नाही.म्हणूनच आज तिन्ही मुले कर्तुत्वान झाली.त्यांनी समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण करून दिला. त्यांच्या सर्व सुना उच्च पदवीधर असून नातवंडे ही उच्च शिक्षण घेत आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात त्यांचे कुटुंबीय नेहमीच अग्रेसर असते.या सर्व गोष्टींचा विचार करून आज अकलूज येथील ताहेरा फाउंडेशन अकलूज यांच्यावतीने ज्येष्ठ आदर्श नागरिक पुरस्काराने श्रीमती सुभद्रा वसंत लोंढे यांना सन्मानित करण्यात आले .यावेळी अध्यक्षस्थानी सहकार महर्षी शंकर मोहिते पाटील कारखान्याचे चेअरमन आदरणीय जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळदादा हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नामांकित डॉक्टर एम के इनामदार आणि प्रसिद्ध चार्टर्ड अकौंटंट आर.सी.फडे.उपस्थीत होते. या सन्मानाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.