काल माळवाडी येथे कै.विठ्ठल पांडुरंग व्यवहारे यांच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव अमित व्यवहारे व कै. विठ्ठल व्यवहारे युवा फाउंडेशन यांच्यावतीने यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं.
या शिबिराचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर मामा भरणे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण भैय्या माने, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे,माळवाडी गावचे सरपंच बाळासाहेब व्यवहारे, पिंपरी गावचे सरपंच नानासाहेब नरोटे,कर्मवीर कारखान्याचे माजी संचालक अतुल व्यवहारे,माळवाडी तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय रायकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष दीपक रायकर,अक्षय व्यवहारे माळवाडी गावचे उपसरपंच भास्कर मदने तसेच अमित व्यवहारे मित्रपरिवार यावेळी उपस्थित होते. ज्ञानदीप ब्लड सेंटर नातेपुते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात सहकार्य केले.या शिबिरात 100 बाटल्याहून अधिक रक्त संकलन करण्यात आले.रक्तदात्यास अमित व्यवहारे मित्र परिवारातर्फे विविध वस्तू भेट दिल्या.
धनुष्यबाण चिन्ह शिंदेना: काय वाटते सामान्य इंदापूरकरांना? महाराष्ट्रातील पहिला ग्राउंड रिपोर्ट पुढील लिंकवर: https://youtu.be/96UI7J_epPk https://youtu.be/96UI7J_epPk