महाराष्ट्र मंडळाच्या उत्कृष्ट नियोजनातून शिवजयंती साता समुद्रापार उत्साहात साजरी.

अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जल्लोषात केवळ महाराष्ट्रातच नसून आणि सातासमुद्र पार साजरी करण्यात आली.
पूर्व आफ्रिकेतील युगांडामध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली.आफ्रिकेतील युगांडा देशात वसलेल्या आणि कामानिमित्त येथे स्थायिक झालेल्या काही महाराष्ट्रीयन कुटुंबांनी एकत्र येऊन 27 वर्षांपूर्वी महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली. महाराष्ट्र मंडळ नोंदणीकृत संस्था आहे या संस्थेत 100 हून अधिक महाराष्ट्रीयन सभासद आहेत. शिवजयंती निमित्त महाराष्ट्रीयन सभासदांनी एकत्र येऊन धुमधडाक्यात युगांडा मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली.या शिवजयंती उत्सवात महाराजांचे 25 फुटी भव्य तैल्यचित्र आणि महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.भारताचे उच्च आयुक्त श्री अजय कुमार जी यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी आर्य समाजाचे येथे महायज्ञ करण्यात आला.या कार्यक्रमास 500 हून अधिक भारतीयांनी हजेरी लावली या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या मंडळाचे अध्यक्ष श्री सुधीर बलसुरे,मनोज पवार तसेच या मंडळाचे असणारे सर्व भारतीय सभासद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ढोल ताशाच्या गजरात यशस्वीरितेने पार पाडली.



🏹 धनुष्यबाण चिन्ह शिंदेना: काय वाटते सामान्य मराठी माणसाला? महाराष्ट्रातील पहिला ग्राउंड रिपोर्ट पहा पुढील लिंक क्लिक करून https://youtu.be/96UI7J_epPk https://youtu.be/96UI7J_epPk
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here