अखिल निमगाव केतकी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले सकाळी शिवप्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, माजी बांधकाम समिती प्रवीण भैय्या माने, इंदापूर अर्बनचे अध्यक्ष देवराज भाऊ जाधव, सरपंच प्रवीण भैय्या डोंगरे, यश उद्योग समूहाचे दीपक भाऊ जाधव, शिवधर्म फाउंडेशन चे दीपक अण्णा काटे, माजी सभापती अंकुश दादा जाधव ,दत्तात्रय शेंडे, तुषार जाधव, मच्छिंद्र चांदणे, तात्यासाहेब वडापुरे, नानासाहेब शेंडे ,तुषार खराडे, राजकुमार जठार, अतुल मिसाळ, दाजी देठे महादेव पाटील ,बबनराव खराडे, बाबासाहेब भोंग ,असलम मुलानी ,संतोष राजगुरू, दादाराव शेंडे ,सुभाष भोंग, माणिक भोंग, संदीप भोंग, दादासाहेब शेंडे, राजू भोंग, तसेच समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.अखिल निमगाव केतकी शिवजयंती उत्सवानिमित्त विविध वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या वकृत्व स्पर्धेमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना आलेल्या मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. निमगाव केतकी हे कुस्त्यासाठी प्रसिद्ध असलेले गाव मुलांच्या बरोबर मुलीही कुठेच कमी नाही हे उदाहरण निमगाव केतकी मधील पै.सानिया मुलाणी, व पै.सृष्टी भोंग यांनी राष्ट्रीय कुस्तीसाठी स्पर्धेसाठी या दोन्ही मुलींची निवड करण्यात आली यांचाही अखिल निमगाव केतकी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपारिक वाद्य ने भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये महिलांना भगवे फेटे घालण्यात आले यामुळे येथील वातावरण भगवे मय झाले होते
हा शिवजयंती उत्सव यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी या समितीचे किशोर पवार, भारत मोरे, राजकुमार घाडगे, नंदकुमार चकोर, वैभव मोरे ,गणेश घाडगे ,गणेश शेळके, समीर मोरे, विवेक शिंदे, रोहन जाधव, दिनेश घाडगे, व समस्त अखिल निमगाव केतकी शिवजयंती उत्सवाचे सर्व सहकाऱ्यांनी पार पाडले