“आता इंदापूर तालुक्यातही भाजपा विरोधात राजकारण फटी वाढूनच”- मेजर महादेव सोमवंशी.

इंदापूर: शिवसेनेला अडचणीत आणण्यामागे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच कारणीभूत आहे त्यामुळे आता गावागावातुन तालुकास्तरापर्यंत राजकारण करताना भारतीय जनता पार्टीला कोणत्याच प्रकारे सहकार्य करणार नाही…भाजपा विरोधात आता राजकारण फटी वाढूनच.. अशा प्रकारची भूमिका शिवसेना शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी यांनी आज जनता एक्सप्रेस मराठी न्यूज ला बोलताना दिली.
“कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा.. ही म्हण आता पटू लागली आहे,इंदापूर तालुक्यात महाविकास आघाडीचा धर्म प्रामाणिकपणे पाळण्याचा यापुढे आम्ही प्रयत्न करू आणि भारतीय जनता पार्टीला धडा शिकवू” अशी कडक भूमिका शिवसेना शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी यांनी मांडली.
खर तर इंदापूर तालुक्यात गेल्या पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपा युती होती,शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना साथ देत जोरदार प्रचार केला होता.महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गट स्थापन झाल्यानंतर मुळ शिवसेनेत अनेक पडझडी झाल्या होत्या,अनेक दिग्गजांनी पक्षांतर केले होते परंतु इंदापूर तालुक्यातील एकही शिवसैनिक फुटला गेला नव्हता.पुढील वर्षी 2024 च्या निवडणुकीत मात्र भारतीय जनता पार्टी व शिवसेना उद्धव ठाकरे गट यांची युती होईल असं वाटत नाही त्यामुळे यापुढे इंदापूर तालुक्यातील शिवसेना (उध्दव ठाकरे)आणि भारतीय जनता पार्टी यांचा संघर्ष पाहिला मिळणारच अशीच चर्चा आता इंदापूर तालुक्यात रंगू लागली आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here