इंदापूर(उपसंपादक: संतोष तावरे): महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यात विकास गंगा आणली. इंदापूर तालुक्यातील रस्ते चकाचक केले. एवढेच नव्हे तर इंदापूर तालुक्यातील अनेक गावां-गावांना, वाड्या-वस्त्यांना जोडण्याचे कामही आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून झालेले अवघ्या इंदापूरकरांनी पाहिले आहे. असं म्हटलं जातं की महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्रात सर्वात जास्त रस्त्यांची कामे इंदापूर तालुक्यात झालेले आहेत आणि याच सर्व श्रेय माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना आहे.परंतु याची दुसरी जर बाजू पाहिला गेलं तर इंदापूर तालुक्यात अवसरी वडापुरी हा महत्वपूर्ण रस्ता गेले कित्येक वर्षापासून दुर्लक्षितच राहिला आहे त्यामुळे आता अवसरी वडापुरी रस्ता दुरुस्त करायचा राहिलाच कसा ? अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून होत आहेत.अवसरी वडापुरी रस्त्यावरून जावा…. अन् …. आयोडेक्ससह झंडू बाम लावा… अशीच परिस्थिती या रस्त्यामुळे झाली आहे.या रस्त्यावरून ऊस वाहतूक व भांडगाव देवस्थान म्हसोबाला जाणारी वाहतूक सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असते परंतु भरणे मामांनी हा रस्ता का केला नाही? अशीच काहीशी कुजबुज लोकांमधून होताना दिसत आहे.निरा भिमा कारखान्यासाठी ऊस वाहतूक याच रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर होत असते ट्रॅक्टर चालकांना मोठ्या कसरतीने या रस्त्याचा सामना करत कारखान्यापर्यंत पोहोचावे लागते.मोठ्या प्रमाणावर अपघात सुद्धा होत आहेत भरणे मामांनी तर या रस्त्याकडे दुर्लक्ष केलेच आहे.परंतु हर्षवर्धन पाटील यांनी सुद्धा त्यांचेच शिंदे फडणवीस सरकार आहे तरीसुद्धा त्यांनीही दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे अवसरी वडापुरी गावातील व या रस्त्यावरून जाणारे कित्येक लोकांनी भरणे मामा व हर्षवर्धन पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.दुचाकी मोटरसायकलचेही या रस्त्यावर वारंवार अपघात होताना दिसत आहेत हा रस्ता पूर्ण खड्डेमय झाला असून गाडीबरोबर लोकांची हाडे सुद्धा मोडतात की काय?असे वाटू लागले आहे. अनेक शाळकरी मुलांसह वृद्धांनाही या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नाहक त्रास होत आहे. आणि यामुळेच या रस्त्याकडे सर्व राजकारण बाजूला ठेऊन भरणे मामांनी किंवा महाराष्ट्र शासनामार्फत हर्षवर्धन पाटील यांनी हा रस्ता पक्का डांबरीकरण करून द्यावा म्हणजे आयोडेक्ससह झेंडू बाम लावण्याची नागरिकांवर वेळ येणार नाही.
Home Uncategorized 🤬 अवसरी,वडापुरीतील लोकांचे दुखणं:- अवसरी – वडापुरी रस्त्याने जावा.. अन्… घरी जाऊन...