इंदापूर: काल इंदापूर तालुक्यातील टणू गावात बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ माजली होती. एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुक्त संचार व्यवस्था असलेल्या गाईच्या गोठ्यामध्ये बॉम्ब सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.
नक्की हा बॉम्ब सदृश्य वस्तू कोठून आली? ती कोणी ठेवली? त्या बॉम्बची क्षमता किती? असे अनेक प्रश्न मनामध्ये निर्माण झालेली होत होते. दरम्यान काल घटनास्थळी तहसीलदार श्रीकांत पाटील,इंदापूरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, बावड्याचे पोलीस उपनिरीक्षक नागनाथ पाटील हे स्वतः उपस्थित राहुन याबाबत अधिकची माहिती घेत होते. पोलीस प्रशासनाकडून सतर्कता म्हणून मोहिते वस्तीवरील स्थानिक रोड बंद करण्यात आलेला आहे.
👉 इंदापूर पोलिसांची खरी कसोटी: सदरची घटना ही गंभीर स्वरूपाची असून नक्की ही बॉम्ब सदृश्य वस्तू कुठून आली? कोणी आणली? याचे कोडे सोडवणे अवघड जाणार आहे त्यामुळे यानिमित्त का होईना पण पोलीस निरीक्षक दिलीप पवार व उपनिरीक्षक नागनाथ पाटील यांची खरी कसोटीपणाला लागणार आहे.
👉 विशेष पथक हजर नाही: दरम्यान ही बॉम्ब सदृश्य वस्तू सापडून खूप तास होऊन गेले तरी सकाळी 9.30 वाजता माहिती घेतली असता बॉम्ब निकामी करण्यासाठी जे विशेष पथक आहे ते आणखी दाखल न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असे विशेष पथक बोलवण्यासाठी प्रशासनाची खूप मोठी प्रोसिजर पूर्ण करावी लागते का? असाही प्रश्न या बाबत निर्माण होत आहे.
👉बॉम्बचे वाळू कनेक्शन?: टणू,नरसिंगपूर हा भाग वाळूसाठी प्रसिद्ध असलेला भाग आहे. या ठिकाणी अवैधरित्या वाळू उपसा केली जाते हे काही नवीन नाही.कदाचित याच कामासाठी किंवा मुरूम काढण्यासाठी जिलेटिन सारखा वापर तर केला जात नाही ना? असाही प्रश्न या बाबतीत उपस्थित होतोय. त्यामुळे या बॉम्बचे वाळू तस्करीचे कनेक्शन आहे का? अशीच चर्चा चालू आहे.