इंदापूर तालुक्यात एक खळबळ जनक घटना समोर येत आहे इंदापूर तालुक्यातील टणू या छोट्याशा ग्रामीण भागातील गावांमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने तालुक्यामध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झालेले आहे.टणू येथे आढळल्याची बातमी वाऱ्यासारखी इंदापूर तालुक्यामध्ये पसरली होती ही अफवा आहे की सत्य परिस्थिती हे जाणून घेण्यासाठी अनेकांचे फोन या गावांमधील ओळखीच्या व्यक्तींना करण्याचे सत्र चालू होते.परंतु या बाबतीत आता इंदापूर पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी स्पष्टीकरण दिले असून दत्तात्रय मोहिते नामक शेतकऱ्याच्या गाईच्या गोठ्यामध्ये ही वस्तू सापडली असून ही टेनिस बॉलच्या आकाराची आहे. सदरची वस्तू ही बॉम्ब आहे की इतर काही याबाबत खात्रीलायक माहिती देऊ शकत नाही परंतु ही वस्तू विशेष पथकाकडे सोपवण्यात आली असून अंधार पडल्याने बॉम्ब असेल तर निकामी करता येणार नाही म्हणून सकाळपर्यंत वाट बघून पुढील योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती इंदापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.एकंदरीतच या ठिकाणी मिळालेल्या बॉम्बसदृश्य वस्तूमुळे इंदापूर तालुक्यासह जिल्हा मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व खरंच ही वस्तू बॉम्ब आहे की इतर काही याविषयी मात्र विशेष पथकाकडून उद्या खात्रीदायक एक स्पष्टता होईल.
Home Uncategorized इंदापूर तालुक्यामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने भीतीचे वातावरण… शेतकऱ्याच्या गोठ्यात सापडली हा...