👉 इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे कार्य कौतुकास्पद.
इंदापूर: ग्रुप ग्रामपंचायत बिजवडी पंचक्रोशीतील मौजे गागरगाव (कदम वस्ती) येथील श्रावण बाळ योजनेच्या लाभापासून वंचित असलेले वयोवृध्द श्रद्धेय माता आणि पिता यांना श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळवून देणे कामी जवळ पास १२ पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव श्री.अनिल ठोंबरे.(नायब तहसीलदार) यांचे कार्यालयाकडे पात्र लाभार्थ्यांच्या उपस्थीत आणि इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी चे निरीक्षक मां.श्री बिभीषण लोखंडे,इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष निवास अण्णा शेळके, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य एम बी लोंढे,आपली नाती,आपली माणसं,आपला परिवार ग्रुप चे इंदापूर तालुका अध्यक्ष श्री शिवाजीराव आहेर, उत्तम चव्हाण यांच्या सहकार्याने सादर केले.
इंदापूर तालुक्यात या योजनेपासुन अनेक लाभार्थी पात्र असताना देखिल ते या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.
जे लाभार्थी या योजनेपासुन वंचीत आहेत त्यांना देखील लाभ मिळवून दिला जाईल या साठी लाभार्थीना मोफत फॉर्म देखील दिला जाईल यासाठी आपली नाती आपली माणसं आपला परिवार ग्रुप चे इंदापूर तालुका अध्यक्ष श्री शिवाजीराव आहेर यांचेशी 8625021972 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे सचिव एम बी लोंढे यांनी केले.या वेळी लाभार्थ्यांनी इंदापूर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार अनिल जी ठोंबरे यांनी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या सर्वच पदाधिकारी यांचे आभार मानले.
Home Uncategorized श्रावण बाळ योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या लाभार्थींचे काँग्रेसमार्फत प्रस्ताव दाखल