माजी मंत्री हर्षवर्धन पाटील: कसबा मतदारसंघ तसेच पिंपरी चिंचवड मतदार संघाचे भाजपाकडून स्टार प्रचारक

पुणे येथील कसबा मतदारसंघ तसेच पिंपरी चिंचवड येथील मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपचे स्टार प्रचारक म्हणून असणार आहेत.
मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने अनुक्रमे कसबा आणि पिंपरी चिंचवड येथील नुकतीच पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली असून या मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे स्टार प्रचारक म्हणून कार्यरत असणार आहेत.
या दोन्ही मतदारसंघाच्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ते भाजपचे दोन्ही उमेदवार बहुमताने निवडून येण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत.भाजप हा सर्वात मोठा पक्ष असून महाराष्ट्रात आणि केंद्रात भाजपचे डबल इंजिन सरकार असून विकासाची घोडदौड अशीच पुढे चालू राहण्यासाठी या मतदारसंघातील मतदारांना भाजपच्या पाठीशी ठाम राहण्यासाठी ते आवाहन करणार असून त्यासाठी योग्य मोर्चा बांधणी देखील करणार आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here