श्री हनुमान विद्यालय अवसरीच्या विश्वविक्रम प्रस्थापित करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रजासत्ताक दिनी विशेष सन्मान.

स्वतंत्र भारताचा 74 वा प्रजासत्ताक दिन अवसरी येथील श्री हनुमान विद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लोकसेवा गणपतराव आवटे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर आवटे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अरुणदादा शिंगटे, मार्गदर्शिका सौ.विजयाताई शिंगटे मॅडम ,सरपंच श्री संदेश शिंदे ,उपसरपंच आदित्य शिंदे ,अमित शिंगटे, डॉ धिरज शिंगटे, कर्मयोगी साखर कारखान्याचे संचालक शांतीलाल शिंदे पाटील, जिजाऊ दुध संकलन केंद्राचे सौरभ शिंदे पाटील,ग्रामसेविका सौ व्यवहारे मॅडम, यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य,मान्यवर ग्रामस्थ यांसह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमापूजन व पुष्प अर्पण करून आणि मशाल प्रज्वलित करून महामानवांना अभिवादन करण्यात आले. तद्नंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वज पूजन व ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी विद्यालयाच्या श्री गवळी सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी संचलन करीत मान्यवरांना सलामी दिली तसेच आकर्षक,सामुहिक कवायत करण्यात आली .यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रवीण लोंढे सर यांनी प्रास्ताविक करताना विद्यालयाचा इतिहास आणि विद्यालयातील वेगवेगळ्या कामकाजाविषयी थोडक्यात माहिती सांगितली. यावेळी उपस्थित मान्यवर सागर आवटे यांचा अरुण दादा शिंदे यांच्या हस्ते तर अरुण दादा यांच्या श्री सागर आवटे सर यांच्या फाउंडेशन च्या वतीने शाल, पुष्पहार, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विश्वविक्रम प्रस्थापित करु पाहणाऱ्या एपीजेएस्एलव्ही मिशन 2023 मध्ये सहभागी झालेले आणि संपूर्ण विद्यालयाची अभिमानास्पद वाटचाल करणाऱ्या दहा विद्यार्थी चैतन्य झगडे, समृद्धी मोरे ,प्रज्ञा बाबर ,पूनम कवितके ,सुस्मित बोराटे, रोहन कवितके ,महादेवी गुरव ,आरती पोळ, श्रद्धा पवार व शाहिद शेख यांचा अध्यक्ष अरुणदादा शिंगटे तसेच मार्गदर्शिका शिंगटे मॅडम आणि या विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी बहुमोल मदत करणारे सागरजी आवटे  यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपस्थितांनी सर्व विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले .यानंतर विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांची समयोचीत भाषणे झाली. याचबरोबर अवसरी ग्रामपंचायत घोषित केलेल्या शौचालय युनिटचेही भूमिपूजन ग्रामसेविका सौ व्यवहारे मॅडम ,सरपंच संदेश शिंदे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री घळके सर आणि कवायत संचालन श्री राऊत सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री रसाळ सर यांनी केले.शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी. विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ,बहुसंख्य ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here