भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हाऊस ऑफ कलम स्पेस झोन इंडिया मार्टिन ग्रुप यांच्या वतीने डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम सॅटेलाईट लॉन्च व्हेहिकल मशीन 2023 आयोजित करण्यात आले आहे. आणि अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या मशीन साठी श्री. हनुमान विद्यालय अवसरी येथील विद्यार्थ्यांची विश्वविक्रमाकडे वाटचाल सुरू असतानाच आणखीनही या विद्यालयातील विद्यार्थी जाधव प्रतीक्षा संदीप, पवार सौरभ शिवाजी, कवितके तनुजा कैलास, झगडे सिद्धी शरद, तावरे श्रुती संतोष, पवार श्रद्धा शिवाजी या विद्यार्थ्यांचा निबंध स्पर्धेमध्ये डंका पहावयास मिळत आहे .आणि या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे श्री हनुमान विद्यालयातील शिक्षक श्री. गवळी सर यांचेही विद्यार्थ्यांबरोबरच विशेष कौतुक अवसरी, बेडशिंगे ,भाट निमगाव, तसेच विद्यालयाचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, यांनी केले. इंदापूर तालुका हिंदी अध्यापक संघ यांच्या वतीने आज दिनांक 21 जानेवारी रोजी उपक्रमशील हिंदी विषय शिक्षक तसेच हिंदी निबंध स्पर्धेमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी विद्यार्थिनी, व हिंदी विषयांमध्ये अखंड सेवा करून निवृत्त झालेले शिक्षण यांचा सन्मान करण्यात आला . या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिक्षण विभाग पुणे माजीआमदार दत्तात्रय सावंत सर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ छाया पाटील ,कुलकर्णी सर ,कैलास जाधव सर डॉक्टर गणेश करे पाटील सर अशोक मर्चंट सर श्री विठ्ठल शिंदे, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी श्री सावंत सर यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना राष्ट्रभाषा हिंदी ही सर्वांनाच बोलता आली पाहिजे आणि त्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नवादी असावे हिंदी भाषा ही घराघरातून बोलली जावी असे मत व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षक व पालक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुणे जिल्हा समन्वयक हिंदी शिक्षण विभाग श्री मुलानी सर तसेच भोंग सर, पांढरे सर गाढवे सर निंबाळकर सर, यांनी प्रयत्न केला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भोंग सर यांनी केले व आभार प्रदर्शन सोळसे सर यांनी केले.
Home Uncategorized श्री हनुमान विद्यालय अवसरी मधील विद्यार्थ्यांची विश्वविक्रमाकडे आगेकूच चालू असतानाच, विद्यालयातील विद्यार्थ्यांचा...