शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी प्रमुख पक्षांना बाजूला ठेवून नवीन राजकीय पर्याय उभारण्याचा प्रयत्न करावा- शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील

शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी सन 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना आणि भाजप या प्रमुख राजकीय पक्षांना बाजूला करून राजकीय पर्याय उभारण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी मुंबईत केले. महाराष्ट्र विकास आघाडीचे ॲड.अण्णाराव पाटील,लातूर यांच्या पुढाकाराने मुंबईतील हाॅटेल ॲम्बेसेडर येथे दि.20 जानेवारी 2023 रोजी दुपारी 1 वाजता बैठक झाली.बैठकीला गोरगरिबांच्या प्रश्नावर आवाज उठविणाऱ्या महाराष्ट्रातील सुमारे 25 सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी हजर होते. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा.रघुनाथदादा पाटील यांनी दोन साखर आणि इथेनॉल कारखान्यातील हवाई अंतराची अट आणि गोवंश हत्याबंदी कायदा तातडीने रद्द करण्याचा कार्यक्रम हाती घेतला , गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे दुग्ध व्यवसाय उध्वस्त झाला आहे. ज्या राज्यांनी हा कायदा राबवला आहे त्या राज्यात लंपी रोगाचे प्रमाण जास्त आहे. जनावरांचे प्रजनन आणि सांभाळ याचा काहीही अभ्यास नसलेल्यांनी आखलेली धोरणे याला कारणीभूत आहेत असा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी केला. येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीचे चित्र शेतकरी बदलून टाकतील असेही प्रतिपादन पुढे त्यांनी केले.या बैठकीला शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे शिवाजीराव नांदखिले, शेतकरी संघटनेचे मुंबई विभाग प्रमुख ॲड.गणेश घुगे, शंकर मोहिते,पंकज माळी,मयुरेश शंभूदास आदी उपस्थित होते.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here