इंदापूर तालुक्यातील हर्षल राऊत याची ऑल इंडिया नॅशनल युनिवर्सिटी कुस्ती स्पर्धेसाठी निवड.

डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ,लोणेरे रायगड अंतर्गत फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि रिसर्च सेंटर व फार्मसी कॉलेज, सांगोला विद्यमाने आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा दि 17 जानेवारी 2023 रोजी पार पडल्या.
या स्पर्धेत कै.लक्ष्मीबाई फडतरे कॉलेज ऑफ फार्मसी, कळंब वालचंदनगर महाविद्यालयचा फार्मसी द्वितीय वर्षाचा विद्यार्थी हर्षल राऊत विजयी झाला.या विजयानंतर हर्षल राऊत याची 97 kg वजन गटात ऑल इंडिया नॅशनल युनिवर्सिटी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली.हर्षल राऊत हा मूळ पडस्थळ गावचा शेतकरी कुटुंबातील खेळाडू आहे.
हर्षल यास कुस्ती प्रशिक्षणासाठी मारुती मारकड सर इंदापूर जयबीर लोचक ,मन्नुलोचक, संनजीत कोच हरियाणा याचे मार्गदर्शन लाभले.हर्षल राऊत कुस्ती स्पर्धेत विजयी झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष उत्तम फडतरे, फार्मसीचे प्राचार्य डॉ प्रवीण उत्तेकर व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रदेश युवक उपाध्यक्ष नवनाथ शेवाळे यांनीही पुढील स्पर्धेसाठी कु हर्षल राऊत यांना शुभेच्छा दिल्या.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here