पालघर तालुक्यातील सफाळे ही 50 ते 60 गाव मिळून मोठी बाजारपेठ असून रेल्वेच्या पूर्व पश्चिम भागातील नागरिकांना कामासाठी व ट्रेन पकण्यासाठी सफाळे बाजारपेठेत यावे लागते. वाढत्या नागरिकरणामुळे सफाळे फाटक ते स्टेट बँकपर्यंत दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीमुळे ट्रेन पकडणे जिगरीचे झाले आहे .
पश्चिम रेल्वे मार्गावरील सफाळे रेल्वे स्थानक हे महत्त्वाचे मानले जात असून पूर्व पश्चिम भागातील गावांमधील नागरिक दररोज नोकरी, व्यवसाय, शिक्षण आदिनिमित्त मुंबई व गुजरात कडे प्रवास करत असतात. मुंबईहुन केळवा बीचवर जाण्यासाठी पर्यटक याच रस्त्याचा वापर करत असल्याने वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाढत्या शहरीकरण व अरुंद रस्त्यामुळे सफाळे बाजारपेठेत वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
तसेंच एका बाजूने रेल्वे डीएफसीसी विस्तारकरणाचे काम सुरू असून अवजड वाहनांची ही वाहतूक कोंडीसाठी डोकेदुखी ठरली आहे. वाढत्या रिक्षा, डमडम यांचीही वाट झपाट्याने होत असुन वाहतूक कोंडीचे निमंत्रण काही केला होत नाही. कालांतराने सफाळे रेल्वे फाटक ते भारतीय स्टेट बँक पर्यंत नो झोन पार्किंग करण्याची काळाची गरज असून वाहतूक कोंडी आटोक्यात येऊ शकते. मागे मुख्य बाजार पेठेत P1 व P2 ची पार्किंग व्यवस्था केली होती पण ती आता फक्त नावाला उरली आहे.वाहतूक कोंडीमुळे सफाळे बाजारपेठ खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना, रेल्वे प्रवाशांना फटका बसत असून वाहतूक कोंडीमुळे वाट काढून पुढे जावे लागण्याची वेळ येत असते. त्यामुळे सफाळे बाजारपेठेत दैनंदिन वाहतूक कोंडी ही समस्या जटील झाली असून सोडवण्याच्या दृष्टिकोनाने प्रयत्न करायला हवेत. त्याचप्रमाणे बाजारपेठेत वेड्यावाकड्या दुचाकी पार्किंग मुले नागरिकांना त्रास होत असून वाहतूक कोंडी समस्या सोडवण्यासाठी डोकेदुखी ठरली आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम सुटावा म्हणून प्रयत्न करणं काळाची गरज आहे.
प्रतिक्रिया
“सफाळे रेल्वे फाटक ते इब्राहिम बिल्डिंग पर्यंत नो पार्किंग झोन केलास वाहतूककोंडी कमी होईल.”
– राजेश म्हात्रे
उपसरपंच उंबरपाडा-सफाळे ग्रामपंचायत
प्रतिक्रिया
“मुख्य बाजारपेठेत नो पार्किंग एरिया करावा तसेच दिवसभर बेसिस्त गाडी पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करावी.”
– शैलेश घरत,ग्रामस्थ सफाळे.