महिलांचे कणखर नेतृत्व: छायाताई पडसळकर राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा इंदापूर – वाढदिवस विशेष:

नेतृत्व हे व्यवस्थापनाच्या अनेक तत्त्वांपैकी एक महत्त्वाचे तत्त्व आहे. कोणत्याही कार्याच्या अंमलबजावणीत नेतृत्वाची अत्यंत गरज असते. एका नियोजित ध्येयपूर्तीकडे घेऊन जाण्यासाठी आणि कार्याचे नियंत्रण व मार्गदर्शन करण्यासाठी अनेकदा योग्य नेतृत्वाची गरज भासते. आणि योग्य नेतृत्व मिळालं तर संबंधित जबाबदारी योग्यरीत्या पार पडून समाज हिताचे काम पार पडते. असंच एक इंदापूर तालुक्यातील महिला नेतृत्व म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा छायाताई पडसळकर.इंदापूर तालुक्यात महिला बचत गटाचे कार्यक्रम असो की कृषी प्रदर्शनासारखे मोठमोठे आदर्शवत कार्यक्रम. कार्यक्रम चांगला होण्याकरिता परिश्रम घेताना त्यांची तळमळ लक्षात येते.
इंदापूर तालुक्यातील काटी गावच्या रहिवाशी असलेल्या छायाताई पडसळकर या रणरागिनी ने तसा चूल आणि मूल याचा विचार न करता आपलेही या पलीकडे विश्व आहे हे दाखवून दिले.महिला बचत गटाच्या माध्यमातून कार्यरत असताना महिलांचे संघटन करून न्याय हक्कासाठी लढण्याची सवय झाली त्यातूनच २००८ साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इंदापूर तालुका महिला कार्याध्यक्षपदी निवड झाली. खऱ्या अर्थाने त्याच वेळी पुरुषांच्या बरोबरीने राजकारण व समाजकारण करण्याची संधी या वाघिणीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मिळाली.पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनी महिलां विषयी राबविलेल्या धोरणांना समोर ठेवून महिलांचे संघटन करून पक्षवाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याने ओबीसी महिला तालुकाध्यक्षपद चालूनच आले. मग मात्र महिला विषयी प्रश्न तडीस नेण्यासाठी पक्ष हे आपले माध्यम आहे याची खूणगाठ मनात ठरवून महिलांच्या प्रश्नाचे सोडवणूक करण्यासाठी शासन व प्रशासनात आक्रमक पद्धतीने काम करण्यास सुरुवात केली. अनेक बचत गटाची स्थापना करून महिला स्वयंपूर्ण व्हाव्यात यासाठी प्रयत्न केला. महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरणासाठी, प्रामाणिक प्रयत्न केला. महिलांच्या आरोग्य विषयी जनजागृती करण्यासाठी आरोग्य शिबिरे आयोजित केली. आणि याच कामाची दखल घेऊन ” सावता परिषद अरण” या संस्थेकडून २०१७ साली ” सावित्रीबाई फुले जीवन गौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.लगेच पुढच्याच वर्षी २०१८ सली सुप्रिया सुळे यांनी या सावित्रीच्या लेकी वर पक्षाची राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष पदी निवड करून खऱ्या अर्थाने पक्षांमध्ये कर्तुत्वाला वाव दिला जातो हे सिद्ध करून दाखविले.या कामाच्या जोरावर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व मोहोळ चे आमदार यशवंत तात्या माने यांच्या हस्ते २०१९ साली ” सामाजिक जीवन गौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला खरे पण जबाबदारीचे फार मोठे ओझे खांद्यावर घेऊन पक्षवाढीसाठी व पक्षाची ध्येयधोरणे महिलां विषयी पक्षाची भूमिका समर्थपणे तालुक्यातील महिलांमध्ये जनजागृती केल्याने, चैतन्य फुलवले याचाच परिणाम म्हणून पुन्हा २०२१ साली राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा पदाची जबाबदारी पक्षांनी दिल्याने, समाजकारण व राजकारण करण्यासाठी ही रणरागिनी सज्ज झाली व आजतागायत महिला तालुकाध्यक्ष पदाची धुरा समर्थपणे संभाळत आहेत. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा तालुक्यात कोठेही जाहीर सभेचा कार्यक्रम असेल तर ही सावित्रीची लेक माझ्या पक्षाचा कार्यक्रम आहे ….मला वेळ महत्त्वाची नाही..तर माझ्या पक्षाचा कार्यक्रम ही माझी जबाबदारी समजून त्या ठिकाणी हजर असतात. …… खरंच राजकीय पक्षावर जबाबदार पदाधिकाऱ्यांनी कसे प्रेम करावे हे छायाताई कडूनच शिकावे. त्यांनी आपल्या आयुष्यातील आदर्श …देशाचे नेते पक्षाचे संस्थापक शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे यांना मानले आहे.राजकारणात महिलांनी सहभाग घेण्याबद्दल आपलं मत व्यक्त करताना नेहमीच छायाताई म्हणतात की,”स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना राजकीय आरक्षणाचे कवच प्राप्त झाल्यानंतर व राजकारणात त्यांचा वावर वाढल्यानंतर महिला आत्मविश्वासाने बोलताहेत, काहीतरी करून दाखवण्याची महिलांमधील जिद्द वाढली आहे. स्त्रीच्या राजकारणातील सहभागाविषयीच्या वाढणाऱ्या प्रतिकूलतेला स्त्रियांनी एक शक्ती बनवण्यात यश मिळवले आहे. स्त्रियांनी राजकारणाविषयी नकारात्मकता न बाळगता, राजकारणात येत आहेत. व त्यांनी यावं अशी माझी इच्छा आहे”. असे त्यांचं मत आहे.आज छायाताई आपला वाढदिवस .आपणास राजकीय कारकिर्दीस व वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.. आपल्या हातून अशीच समाजसेवा घडत राहो याच सदिच्छा..  मनापासून शुभेच्छा.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here