हजारो माता भगिनींची सेवा करणारे अनिल (अण्णा) पवार यांना समाजसेवेसाठी प्रोत्साहन देणाऱ्या मातोश्री विमल पवार यांचे दुःखद निधन.

👉 हजारो माता भगिनींची सेवा करणारा अनिल अण्णा झाला पोरका… गरिबांची आई हरपली..
इंदापूर: गेल्या अनेक वर्षापासून समाजातील तळागाळातील माता-भगिनींची सेवा करणारा व इंदापूर शहरात लोकप्रिय असलेला अनिल अण्णा पवार आता पोरका झाला आहे.
अनिल अण्णा पवार यांच्या मातोश्री विमल सुदाम पवार (वय ५५) यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. इंदापूर परिसरामध्ये अनिल अण्णा पवार यांना समाजसेवा करताना प्रोत्साहन देण्यासाठी मातोश्री विमल पवार ह्या नेहमी अग्रेसर असत. समाजासाठी काम करताना “पैसा व वेळ याचे मोजमाप कधीच करायचे नाही” ही त्यांची शिकवण अनिल अण्णा यांनी सुरुवातीपासून आत्मसात केली होती.
कोरोनाच्या काळात लोकांना मदतीला रक्तातीची भाव-बंधकी येत नव्हती पण “अण्णा सर्वांच्या मदतीला जा रे…, गोरगरिबांची सेवा करण्याची हीच मोठी संधी आहे”. असे आवाहन अनिल अण्णा पवार यांच्या मातोश्री विमल पवार ह्या नेहमी करत असत.
शहरातील कोणत्याही जाती-धर्मातील गरिबातील गरीब व्यक्ती अगदी सहजरीत्या अनिल अण्णांच्या मातोश्री कडे जाऊन आपल्या अडीअडचणी सांगत होत्या आणि त्या अडचणी त्या दूर करण्याचा प्रयत्नही करत होत्या त्यामुळे त्यांना समाजात सर्वजण ‘आई’ असंच म्हणायचे.स्वभावाने प्रेमळ असलेल्या या अण्णांच्या आई गेल्या काही दिवसापासून आजारी होत्या. त्यांच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार चालू होता. परंतु आज पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली आणि अनिल अण्णा पोरका झाला.
आज कै. विमल पवार यांचा अंत्यविधी दुपारी ३.३० वाजता शंभर फुटी रोडवरील स्मशानभूमीत होणार आहे. त्यांच्या जाण्याने अनेक गोरगरिबांच्या जणू आई च हरपले आहेत. अशा या गोरगरिबांच्या आईस जनता एक्सप्रेस मराठी न्यूज कडून भावपूर्ण श्रद्धांजली.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here