जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अँड संदीप कदम यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधीसभा सिनेट सदस्य पदी राज्यपालांच्या कोट्यातून नियुक्ती झाली.ॲड संदीप कदम हे नेहमीच गुणवत्तेबरोबर विद्यार्थी व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर वर्ग, यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कायमच अग्रेसर असतात.
दहावी बारावी निकाल वाढीसाठी वेगवेगळ्या योजना राबवून निकालाची पातळी कायमच अव्वल ठेवली आहे .विद्यार्थी व शिक्षक यांच्या सर्वांगीण विकासासाठी कॉमनेटिव्ह एक्सचेंजचे वर्ग संस्थेच्या विविध शाखेत सुरू केले आहेत .
त्याचबरोबर कला, क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रातही वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ते प्रयत्न करीत असतात . यावेळी बोलताना संदीप कदम म्हणाले की,”ग्रामीण व शहरी भागात शिक्षण प्रभावीपणे राबविण्यासाठी अथक परिश्रम घेणार व मिळालेल्या संधीचा शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न करणार” असे अँड .संदीप कदम यांनी सांगितले.