बारामतीचे चुलते पुतणे चोरटे, दिवसा दरोडे टाकणारे – आ.गोपीचंद पडळकर यांची शरद पवार,अजित पवारांवर जहरी टीका.

सध्या राजकारणाची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे का? अशी चर्चा जनसामान्यांमध्ये होत आहे. राजकारणी नेतेमंडळी एकमेकांवर जहरी  टीका करताना अनेक वेळा आपण पाहिले  आहे. अशीच एक जहरी आणि आग ओकणारी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर  केली आहे. बारामतीचे चुलते, पुतणे चोरटे. दिवसा दरोडे टाकतात.शरद पवार यांनी ५० वर्षे राज्य केलं. पण, विकास केला नाही. असा गंभीर आरोप पडळकर यांनी केलाय. शरद पवार हे जाणता राजा नाही, तर नेमता राजा आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. काका-पुतण्याची एकच टोळी राज्यात उपलब्ध आहे. दुसरी टोळीत उपलब्ध नाही,असंही ते म्हणाले.मी असं का म्हटलं, कारण इथं बिबट्याचा विषय आहे. सरकारचा निधी कुठं गेला पाहिजे. सिन्नरला यायला पाहिजे. येथे बिबट्याचा प्रादुर्भाव आहे. सिरूर बाजूला दुसरा तालुका आहे. तिथं निधी यायला पाहिजे. तिथंही बिबट्याचा त्रास होतो.
यांनी पैसे कुठं नेले. एक हजार कोटी बारामतीला. तिथं एकही बिबट्या नाही. मग, ही चोरी नाही तर काय, असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केलाय.
तिजोरी दिली आहे. ती गडप करू नका. ती राज्याची तिजोरी आहे. तुमच्याकडं एका विश्वासानं राज्यानं दिली.
५० वर्षे तुम्ही राज्य केलात. कुणालाही चाळीस वर्ष दिलं तर तो जिल्ह्याचा विकास करेल. यांनी फक्त बारामतीचाच विकास केला.५० वर्षे राज्य त्यांनी केलं. का त्यांना रस्ता करता आला नाही. आपलं सरकार आल्यानंतर रस्ता दिला. केंद्र आणि राज्य सरकार नव्हतं का. सगळं होतं पण, यांची नियत साफ नव्हती, असा हल्लाबोल गोपीचंद पडळकर यांनी केला.यांच्याकडं दुरदृष्टी नव्हती. यांच्याकडं कल्पकता नव्हती. गाव, वाड्या यांचा विकास व्हावा, अशी दृष्टी नव्हती. यांना फक्त या महाराष्ट्रातल्या लोकांचं रक्त शोषायचं होतं, अशी जहरी टीकाही पडळकर यांनी केली.अरे जाणता राजा हा कुठला जाणता राजा आहे. हा नेमता राजा आहे. यांनी या महाराष्ट्रातल्या कुठल्याही गोष्टीचा विचार केला नाही, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले. आता गोपीचंद पडळकर यांच्या चोर आणि दरोडेखोर या शब्दावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला तर नवल वाटायला नको आणि अशा टीकांमधूनच आंदोलने होतात व प्रशासनावर ताण निर्माण होतो. त्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस या जहरी आणि आग ओकणाऱ्या टीकेला कशा पद्धतीने उत्तर देते हे पाहण्याजोगे ठरेल.

 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here