राष्ट्रीय सेवा योजनेतून विविध क्षेत्रातील नेतृत्व घडते – सचिन खुडे.

अक्कलकोट – (प्रतिनिधी) महाविद्यालयीन जीवनात करिअर च्या शोधात धावणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव काय असते याचा अनुभव देणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून विविध क्षेत्रातील नेतृत्व घडते. असे मत अक्कलकोट पंचायत समिती चे गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी व्यक्त केले. सी. बी. खेडगी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उदघाट्न कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अक्कलकोट च्या माजी नगराध्यक्षा शोभाताई खेडगी या होत्या. यावेळी मंचावर संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, व्हाईस चेअरमन अशोक हारकूड, सेक्रेटरी सुभाष धरणे, सरपंच चिदानंद उन्नद, प्राचार्य डॉ. शिवराया अडवितोट, उपप्राचार्य प्रा. बसवराज चड्चन, पर्यवेक्षिका वैदेही वैद्य उपस्थित होते.
प्रारंभी महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बी. डी. ओ. सचिन खुडे आणि चेअरमन बसलिंगप्पा खेडगी यांच्या हस्ते शिबिराचे उदघाट्न करण्यात आले. यावेळी बोलताना सरपंच चिदानंद उन्नद यांनी शिबिरामुळे गाव स्वच्छ आणि सुंदर बनण्यासाठी वातावरणनिर्मिती होईल. असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाधिकारी डॉ. किशोर थोरे यांनी प्रास्तविक केले. कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रकाश सुरवसे यांनी शिबिरातील विविध उपक्रमांचा आढावा घेतला.6 जानेवारी ते 12 जानेवारी या कालावधीत “ग्रामविकासासाठी युवक” हा ध्यास घेऊन शिबीर होत आहे. महाविद्यालयातील 175 विद्यार्थी या शिबिरात सहभागी असून या शिबिरात महिला मेळावा, आरोग्य शिबीर, शेतकरी मेळावा, पशुवैद्यकीय शिबीर, जनजागृतीपर मशाल फेरी, मतदार नावनोंदणी, प्रबोधनपर व्याख्याने असे विविध उपक्रम आयोजित केले आहेत. यावेळी प्राचार्य डॉ. शिवराया अडवितोट, पर्यवेक्षिका प्रा. वैदेही वैद्य, सचिन बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास उपप्राचार्य बसवराज चड्चन, उपसरपंच प्रतिका बनसोडे, डॉ. ज्योती उन्नद, मल्लय्या स्वामी, अनिल तिळगुळे, पोलीस पाटील संतोष बनसोडे, डॉ. अशोक माळगे, प्रा. एस. जे. पाटील, प्रा. संध्या इंगळे, प्रा. दयानंद कोरे, प्रा. दीपिका दिवटे, प्रा. स्नेहा हेबळे, प्रा. ललिता लवटे, प्रा. रत्नप्रभा उप्पीन, उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. चंदन सोनकांबळे यांनी केले तर डॉ. गुरुसिद्धय्या स्वामी यांनी आभार मानले.



चौकट :-
चेअरमन बसलिंगप्पा खेडगी म्हणाले, तरुणांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवुन वाटचाल करावी. आयुष्यात यश मिळवायचे असेल तर शॉर्टकट चा आधार न घेता पुढे जावे. कष्ट हेच यशाचे अंतिम सत्य असून परिश्रमातून प्राप्त झालेले यश अधिक काळ टिकत असतें. त्यामुळे जिद्द चिकाटीने प्रयत्नवादी रहा असा संदेश उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.



Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here