माळवाडी ग्रामपंचायतीवर महिलाराज: उपसरपंच पदी राष्ट्रवादीच्या वनिता भास्कर मदने यांची निवड.

इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायती पैकी माळवाडी या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला झेंडा फडकलेला असून राष्ट्रवादीचे सरचिटणीस बाळासाहेब व्यवहारे यांच्या पत्नी मंगल व्यवहारे ह्या थेट सरपंच पदी निवडून आलेल्या होत्या. आज माळवाडी येथे उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली. इंदापूर तालुक्यात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींपैकी माळवाडी ही ग्रुप ग्रामपंचायत आहे.आज उपसरपंच पदाची निवड प्रक्रियेचा कार्यक्रम होता. निवड प्रक्रिया सरपंच मंगल व्यवहारे व निवडणूक अधिकारी श्री भोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली यात सौ वनिता भास्कर मदने यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.या उपसरपंच निवडीनंतर राज्याचे माजी राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांनी नूतन उपसरपंच व सरपंच यांना शुभेच्छा दिल्या व भविष्यात गावाच्या विकासासाठी लागेल ती मदत करण्यास तयार आहे असेही त्यांनी सांगितले.यावेळी सौ लक्ष्मी अधिकारी गडदे, सौ यमुनाबाई पांडुरंग गोफने, सतीश भीमराव ठवरे, पोपट शिंगाडे,अश्विनी हरिभाऊ म्हेत्रे, कासाबाई सखाराम गार्डे, श्री ज्ञानदेव गार्डे, श्री बापू व्यवहारे, श्री गणेश भोंग सारिका बाळासाहेब मोरे हे सर्व नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते त्यांना सहकार्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब व्यवहारे माळवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय रायकर,नागनाथ व्यवहारे, दीपक रायकर,प्रकाश गडदे,साधू बापू वलेकर, सुभाष वलेकर, बबन क्षीरसागर,दिलीप धायगुडे, गोकुळ व्यवहारे,महादेव व्यवहारे, राजू गार्डे,अनिकेत व्यवहारे, अक्षय व्यवहारे, सतीश मोरे, माधव आप्पा मोरे यांनी सहकार्य केले.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here