यंदाच्या थर्टी फर्स्टवर इंदापूर पोलिसांचा कडक वॉच ! हुल्लडबाजी करणाऱ्यांच्या चुकीला माफी नाही.

इंदापूर : इंदापूर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मुजावरसाहेब यांची बदली झाल्यानंतर इंदापूर पोलिस स्टेशनची जबाबदारी आता प्रदीप सूर्यवंशी यांनी स्वीकारली आहे.गेल्या काही दिवसांपासून प्रदीप सूर्यवंशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चोरी व इतर सर्व प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये पूर्वीप्रमाणेच नियंत्रता दिसून येत आहे. कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मुजावर साहेब यांच्या बदलीनंतर या सर्व गोष्टी पूर्वीप्रमाणेच नियंत्रणात आणण्यात नूतन पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यशस्वी झाल्याने मुजावर साहेबांनंतर चांगला अधिकारी लाभला असा आत्मविश्वास आता इंदापूरकरांना येऊ लागला आहे.
आता अगदी दोन दिवसावर ‘थर्टी फर्स्ट’ च्या नावाखाली नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गर्दी व हुल्लडबाजी टाळण्यासाठी ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करताना हुल्लडबाजी,पुंगळ्या काढून दुचाकी पळवणे, महिलांची छेडछाड आणि ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह करणाऱ्यांना पोलीस कोठडीत रात्र काढवी लागणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी दिला आहे.नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई अति उत्साहाच्या भरात किंवा नशेत गैरकृत्य करू नये यासाठी इंदापूर पोलीस भर कडाक्याच्या थंडीत चौका-चौकात नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी थांबून राहणार आहेत.काही अतिउत्साही युवक मद्य प्राशन करून वाहने भरधाव वेगाने बेदरकारपणे चालवितात. रस्त्यावर ड्रायव्हिंग व स्टंटबाजीसारखे कृत्य करतात. या अति उत्साहीपणामुळे अपघात घडून जीवितहानी होण्याचा धोका जास्त असतोत्यामुळे तालुक्यातील पोलिस स्टेशनअंतर्गत ड्रंक अँड ड्राइव्हच्या विशेष मोहिमेद्वारे कडक अमंलबजावणी करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने पोलिस प्रशासनाने आतापासूनच तयारी केली आहे. नववर्षाचे स्वागत करताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व अपघात होणार नाही याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी केले आहे.
त्यामुळे आता हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांनी थोडं सावधानतेनेच आनंद व्यक्त करावा नाहीतर आपल्या स्वागतासाठी खाकी तयार असेल हे नक्की.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here