👉 भाजपचा विजय हा सर्वसामान्य जनतेचा विजय- राजवर्धन पाटील
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सर्वाधिक भारतीय जनता पक्षाचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य निवडून आल्याने या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा विजय झाला असल्याचे मत इंदापूर तालुका भाजपा युवा मोर्चाचे कोअर कमिटीचे प्रमुख व निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.राजवर्धन पाटील म्हणाले की,’राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेला हा विजय सर्वसामान्य जनतेचा हा विजय असून सर्वसामान्य नागरिकांनी धनशक्तीचा पराभव करीत शिस्तबद्ध प्रचार करीत हे यश संपादन केले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायती निवडणूकमध्ये सर्वाधिक19 ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व आले आहे. सर्वसामान्य जनतेचे मी मनापासून आभार मानतो. सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना मी शुभेच्छा देतो. तळागाळातील सर्वापर्यंत भाजपाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सातत्याने आपण पाठपुरावा करावा.’