👉 शहाजीनगर येथील दत्त देवस्थान साठी निधी कमी पडू देणार नाही – दत्तात्रय भरणे 👉 दत्त देवस्थानच्या विकासासाठी पाच लाखांचा निधी तात्काळ देणार
इंदापूर(प्रतिनिधी): इंदापूर तालुक्यातील विकासकामे करण्यासाठी मला परमेश्वराचा आशीर्वाद आहे.जनतेची कामे करीत असल्यामुळे मला समाधान मिळते.म्हणूनच मला रात्री चांगली झोप लागते.माझ्या नावातच दत्त आहे म्हणून मला दत्त महाराजांचा आशीर्वाद आहे.तसेच आई वाडीलांच्या संस्कारामुळे,माझ्या रक्तातच विकासकामे आहेत.असे प्रतिपादन राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर रेडा, येथील श्री दत्त देवस्थान येथील गुरुचरित्र पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहात बुधवार ( दि. ७ डिसेंबर २०२२ ) रोजी दत्त जयंती निमित्ताने राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी श्रींची पाद्य पूजा करून उपस्थित भक्तगणांना शुभेच्छा दिल्या.यावेळी दत्त जयंती निमित्ताने पहाटेची महापूजा, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.रूपाली अतुल झगडे,यांच्या हस्ते श्रींची महापूजा,अभिषेक पार पडला. तर पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य प्रविण माने, राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री दत्तात्रय भरणे यांनी श्रींची पाद्य पूजा करून उपस्थित भक्तगणांना शुभेच्छा दिल्या.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते, देवस्थानचे प्रमुख तानाजीराव गायकवाड यांनी उपस्थित भक्तगणांचे स्वागत केले.यावेळी माऊली वाघमोडे, विष्णू पंत, सचिन देवकर,किसनराव देवकर,पोपट देवकर व दत्तभक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की,सामजिक काम करीत असताना खूप त्रास होतो.काही लोकं कोणत्याही कामाशी काहीही संबंध नसताना त्याचे श्रेय घेतात,त्याचे मनोमन दुःख होते. मात्र परमेश्वराचे आशीर्वाद असल्याने ते दुःख विसरले जाते.कोण लोकांसाठी काम करतंय, हे परमेश्वर पाहत असतो.त्यामुळे खरा कोण आणि खोटा कोन हे जनतेला माहिती नसले तरी देवाला माहिती आहे.त्यामुळे तालुक्यात अनेक चांगली कामे मार्गी लावायची आहेत.गाव,गट,तट विसरून कामे करायची आहेत,अशीही माहिती आमदार भरणे यांनी दिली.
👉 ” दत्त मंदिर परिसरासाठी पाच लाख रुपयांचा निधी देणार” शहाजीनगर परिसरातील दत्त देवस्थानच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.देव खऱ्या भक्तांच्या मागे असतो.म्हणूनच मोहिते कुटूंबानी देवस्थानचे मंदिर व परिसरातील स्वच्छता उत्तम ठेवली आहे.नागरिकांच्या मागणीचा विचार करून, दत्त देवस्थानच्या प्रांगणात तात्काळ पेव्हर ब्लॉक्स बसविण्यासाठी पाच लाखांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल.अशी ग्वाही माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिली.इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर रेडा येथील श्री दत्त देवस्थानचे श्रींची पाद्य पूजा करून दर्शन घेताना माजी राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे व मान्यवर.
Home Uncategorized “जनतेची चांगली कामे केल्यामुळेच मला रात्री चांगली झोप लागते.”- माजी राज्यमंत्री दत्तात्रय...