गणेश उत्सवापूर्वी दुरुस्ती करा अन्यथा रास्ता रोको करणार :- नवघर-घाटीम मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसेना आक्रमक

वैभव पाटील: पालघर जिल्हा प्रतिनिधी 9850868663
पालघर तालुक्यातील सफाळे पूर्व भागात मुंबई बडोदरा एक्सप्रेस वे चे काम सुरू असुन जीआरआयएल कंपनीच्या अवघड वाहतुकीमुळे नवघर- घाटीम रस्त्याची दुरवस्था होऊन मोठमोठे खड्डे पडले आहेत. गणेश उत्सवापूर्वी खड्डे मुक्त करण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली असून रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
नववर घाटीम रस्त्याची गेल्या काही महिन्यापासून अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सदर रस्त्यावरून दुचाकी व चार चाकी वाहने जीव धोक्यात घालून तारेची कसरत करून प्रवास करण्याची वेळ आली आहे.या रस्त्यावर विद्यार्थी, नोकरदार वर्ग, गरोदर माता, रुग्ण व बाजारपेठेत ये-जा करणाऱ्या नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. या रस्त्यावर मुंबई बडोदरा एक्सप्रेस वे कामासाठी जी आर इन्फ्रा लिमिटेड कंपनीने ठेका घेतला आहे. या कंपनीने ओव्हरलोडेड डंपर भरले जात असुन माती, दगड, खडी व लोखंडी सळई गेल्या वर्षभरापासून रात्र दिवस वाहतूक सुरू ठेवून कोणताही प्रकारे देखभाल दुरुस्ती केली नाही. याचा परिणाम परिसरातील नागरिकांना भोगावे लागत आहे. तसेच जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यांची कोणती परवानगी किंवा पत्र व्यवहार न करता रस्त्याच्या वाहतूक क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने जास्त वजनाची वाहतूक केले आहे. यासंदर्भात पंचायत समिती सदस्या कामिनी पाटील यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता. मात्र याचं गांभीर्य लक्षात न घेता रस्ता दुरुस्ती केला नाही.
गणेशोत्सव पूर्वी हा रस्ता खड्डडे मुक्त करून परिसरातील नागरिक गौरी गणपती उत्सवासाठी सफाळे बाजारपेठेत ये- जा करणाऱ्या भाविकांना त्रास सहन करावा लागणार नाही याची त्वरित दखल घ्यावी.
गणेश उत्सवापूर्वी रस्त्याच्या दुरुस्ती काम पूर्ण न झाल्यास परिसरातील सर्व नागरिकासमेवत जीआर इन्फ्रा कंपनीच्या व प्रशासनाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करू असे निवेदनात म्हटले आहे.या रस्त्या संदर्भात जिल्हाधिकारी, तहसीलदार, बांधकाम विभाग, सफाळे पोलीस ठाणे यांना निवेदनाद्वारे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख केतन पाटील, जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, युवा सेना बोईसर विधानसभा समन्वयक संदीप किणी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here