👉 तालुकास्तरीय स्पर्धेत देऊळगाव राजे शाळेचे घवघवीत यश.
देऊळगाव राजे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त नागनाथ विद्यालय वरवंड येथे तालुकास्तरीय विविध स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये देऊळगाव राजे येथील अनुष्का सुनील मोरे इ.2 री- चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक,
पायल रणधीर गौतम इ.2 री – वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक,
सांची चिंतामणी गिरमकर इ 2 री- वेशभूषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक,
जानवी सचिन काटकर इ 4 थी – प्रश्नमंजुषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक.
क्षितेन सलीम शेख इ 2 री – निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ.
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका गिरडकर यांनी कौतुक केले. प्रथम क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.या स्पर्धेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक वर्ग सुरेश गिरमे , मीना गिरमे व सलीम शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
Home ताज्या-घडामोडी तालुकास्तरीय स्पर्धेत देऊळगाव राजे शाळेचे घवघवीत यश, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठीही विद्यार्थ्यांची निवड