नुकतेच इंदापूर तालुक्याच्या शेजारील मोहोळ तालुक्यामध्ये स्वस्तात मिळते म्हणून नामवंत कंपनीच्या नावाने शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खताचा जेव्हा प्रयोगशाळेमध्ये नमुन्याची तपासणी केली असता, अशा कंपनीचा पोलखोल झाला आहे. शेतकरी काबाडकष्ट करून मातीत घाम गाळल्यावर जे पीक उगवते त्याच पिकावर अवघे जगत असते ,आत्ता अशा बळीराजाची खत कंपनी व विक्रेते फसवणूक करतात अशी चर्चा या घडलेल्या घटनेनंतर चालू आहे. स्वस्तात हे खत मिळत आहे म्हणून शेतकऱ्यांनी १२:६१:० खरेदी केले ,परंतु या खतांच्या नमुन्याची तपासणी खाजगी आणि शासकीय प्रयोगशाळेत करण्यात आली, त्यात खाजगी प्रयोगशाळेत १२:६१:० या खतामध्ये नत्राची मात्रा नागण्य होती, आणि स्फुरद शून्य टक्के होते ,जे नसायला हवे ते त्यामध्ये मिठाची मात्रा मात्र चक्क ९७.३ टक्के होती अशी मात्रा पाहून सर्वच अवाक झाले.खतातील भेसळीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मोहोळ आणि उत्तर सोलापूर मधील खताचे नमुने पुण्याच्या कृषी सहसंचालक विभागाचे तंत्र अधिकारी( गुणनियंत्रण) अशोक पवार यांनी घेतले १२:६१:० या खताच्या ग्रेडमध्ये नत्र १२ टक्के आणि स्फुरदचे प्रमाण ६१ टक्के आवश्यक होते ,नमुना तपासणीसाठी पुणेच्या खत नियंत्रण प्रयोगशाळेत पाठवला होता, त्याचाही अहवाल उपलब्ध झाला आहे, त्यामध्ये नत्राचे प्रमाण अवघे 0.33% तर स्फुरदचे प्रमाण 0.३५% असल्याचे दिसून आले. शास्त्रीयदृष्ट्या साधारण दोन्ही घटकांमध्ये एकूण खताच्या ग्रेडमध्ये अर्धा टक्क्यांपर्यंत तूट एक वेळ ग्राह्य धरली जाते ,पण इथे तर खतातील एकूण घटक किमान अर्धा टक्काही नाही असे निदर्शनास आले ,तसेच या खताचे नमुने तपासणीसाठी सोलापुरात खाजगी प्रयोगशाकडेही दिले होते तिथे तर १२:६१:० या खतामध्ये नत्राची मात्रा १२% पाहिजे ती होती केवळ ०.११टक्के तर स्फुरद ची मात्रा चक्क शून्य असल्याचे आढळून आले .त्यामुळे या खातात भेसळ असल्याचे या दोन्ही अहवालावरून समजले. शेतकरी शिरसाट यांनी पुणे येथील प्रयोगशाळेत त्यांच्याकडील खताच्या नमुन्यातील भेसळीचा घटक तपासला तेव्हा त्यात तब्बल 97.3% एवढा मोठ्या प्रमाणावर मीठ असल्याचा अहवाल आला आणि या खतात केवळ मीठच असल्याचे निष्पन्न झाले. एकूणच मोहोळ व उत्तर सोलापूर मध्ये अशाप्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते तर महाराष्ट्रातील इतर तालुक्यांमध्ये सुद्धा याच प्रकारे फसवणूक केली जात असल्याचे नाकारता येणार नाही .मग प्रश्न असा पडतो इंदापूर जवळील मोहोळ सारख्या ठिकाणी असे घडू शकते मग आपल्या इंदापूर मध्ये अशा खतांमध्ये भेसळ नसू शकते काय? हा शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्न असून नमुना तपासणी जबाबदार असलेल्या कृषी खात्याने त्वरित यासंदर्भात इंदापूर,माढा, दौंड माळशिरस, बारामतीमध्येही खताचे नमुने तपासून खात्री करून घेणे गरजेचे आहे जेणेकरून भविष्यात शेतकरी कोणत्याही अडचणीत सापडून नयेत.
Home Uncategorized शेतकऱ्यांनो…. सावधान ! १२: ६१:० खतामध्ये काही कंपन्या करत आहे भेसळ. इंदापूर,माढा,दौंड,बारामती,माळशिरस...