धक्कादायक बातमी: इंदोरहून अमळनेर(जळगाव) कडे येणाऱ्या एसटी बसला भीषण अपघात. एसटी बस नर्मदा ब्रिज वरून खाली कोसळली.वाचा सविस्तर

अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे की,मध्य प्रदेशातील धारमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. इंदूरहून जळगावमधील अमळनेरकडे येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली.या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 12 ते 15 जण बेपत्ता झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. अपघातग्रस्त बसला क्रेनच्या मदतीने नदीबाहेर काढण्यात आले आहे.
एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस ही जळगावमधील अमळनेर येथे येणार होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एसटीचे अधिकारीदेखील घटनास्थळी रवाना झाले असल्याची माहिती चन्ने यांनी दिली.
👉 नेमकं काय झाले?
महाराष्ट्र सरकारची बस होती, सकाळी 7 च्या सुमारास इंदूरवरुन जळगावकडे जात होती, इंदूरमध्ये 12 प्रवासी चढले.. नर्मदा नदीवरील ब्रिजवरुन खाली कोसळली. आतापर्यंत 15 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. या बसमध्ये 50 ते 55 प्रवासी होते, अशी माहिती आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
👉 मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली दखल::-
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितलं की, इंदूरहून येणाऱ्या बस अपघाताची माहिती मुख्यमंत्री यांनी घेतली आहे. आम्ही अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या दुःखात सहभागी आहोत. सीएम याबाबात अधिक माहिती घेत आहेत
दरम्यान, एसटी बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी घटनास्थळी एसडीआरएफला दाखल होण्याचे निर्देश दिले. मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्री चौहान हे इंदूर जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत.

Google Ad

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here