केंद्र सरकारने ईडीच्या मदतीने सूडबुद्धीतून बदनाम करण्याचे काम सुरू केले असल्याच्या आरोपातून इंदापूर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने निषेध

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि खा.राहूल गांधी यांच्यावर केंद्र सरकारने ईडीच्या मदतीने सूडबुद्धीने बदनाम करण्याचे काम सुरू केले आहे असा आरोप करीत युवक कॉंग्रेसच्या वतीने काल वालचंदनगर येथे निदर्शने करण्यात आली.दिल्ली पोलिसांनी दिल्लीतील काँग्रेस ऑफिसमध्ये घुसून येथील पत्रकार व काँग्रेस कार्यकर्त्यांना केलेली मारहानीचा जाहीर निषेध करत दोषी अधिकाऱयांवर कारवाई करण्यात यावी ही प्रमुख मागणी युवक काँग्रेस मार्फत करण्यात आली आहे .त्याचपद्धतीने अग्नीपथ या अन्यायकारक लष्कर भरती विरुद्ध युवक कॉंग्रेस च्या वतीने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या आदेशानुसार व युवक काँग्रेसचे सरचिटणीस विजयसिंह चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली काल दि १७/६/२०२२ रोजी गार्डन चौक , वालचंदनगर येथे संध्याकाळी ७ वाजता इंदापूर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष मिलिंद साबळे यांचा नेतृत्वाखाली मशाल हातात निषेध फलक घेऊन निदर्शन करण्यात आली यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव विद्यार्थी काँग्रेस (NSUI) अभिजीत गोरे इंदापर, युवक नेते किरण पासगे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अरुण राऊत,इंदापूर शहर युवक काँग्रेस उपाध्यक्ष सुफियान जमादर,संदीप भोसले,इंदापूर युवक सरचिटणीस संदीप शिंदे ,अनिकेत जाधव संतोष शेंडे,सिद्धार्थ गायकवाड, योगेश चव्हाण, मकरंद गायकवाड व युवक काँग्रेसचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here