श्रीगोंदा नगरपालिका ओपन स्पेस वरील अतिक्रमणाबाबत निर्णय ठोस घेणार का ? जनसामान्यात चर्चा..

श्रीगोंदा प्रतिनिधी : वैभव मेथा
श्रीगोंदा शहरातील अतिक्रमण काढण्याचा विषय सुरू झाल्यापासून फक्त सर्व सामान्य अतिक्रमण धारकांवरच कारवाई न होता नियमानुसार सर्वांनवर एकसारखी कारवाई व्हावी याचाच एक भाग म्हणुन कारवाईची सुरुवात राजकीय व्यक्तीनपासुन सुरू करण्याची मागणी समोर आली.आज अतिक्रमण हटाव मोहिमेचा शेवटचा दिवस त्यावर तालुक्यातील आजी माजी आमदारांनी आपआपले ऑफिस पालिकेने सांगितलेल्या नियमाप्रमाणे मोठ्या मनाने काढुन घेतले परंतु
👉काही राजकीय व्यक्तींचे बनकर मळा,शिक्षक कॉलनी तसेच इतर परिसरात पालिकेच्या ओपन स्पेस वरील असलेले अतिक्रमण अद्याप ही जैसे थेच आहे ते काढण्याबाबत पालिका निर्णय ठोस घेणार का ?कि राजकीय हित संबंध पाहुन बाय देणार: ही कार्यवाई फक्त गोरगरीब व हातावर पोट असलेल्या लोकांनवर करून अतिक्रमण मोहीम संपणार हा प्रश्न सर्व सामान्य नागरिक पडला असून याबाबत श्रीगोंदा शहरात लोक चर्चा करताना दिसत आहेत.
बाकी गेल्या तीन दिवसात केलेल्या धाडसी कारवाई बाबत श्रीगोंदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे साहेब व त्यांच्या सहकारी टीमचे सर्वच स्तरातुन विशेष कौतुक होताना दिसत आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here