करमाळा तालुक्यातील उमरड गावात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात पार पडली.

प्रतिनिधी देवा कदम:
दिनांक 14 एप्रिल 2022 रोजी उमरड येथे समस्त गावकऱ्यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. सर्व समाजातील लोकांनी आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यासाठी सहभाग नोंदवला. जयंती उत्सव कमिटीने सर्वत्र लाईट चे डेकोरेशन केले होते त्यामुळे लाईटच्या झगमगाटाने संपूर्ण गाव उजळून निघाले होते.
दि.13 एप्रिल सायंकाळी सावंत गायन पार्टी परंडा यांनी भिमगीते सादर केली.
भिमगीतांच्या कार्यक्रमाने प्रेक्षकांनी मंत्रमुग्ध होऊन आनंद घेतला.
दिनांक 14 एप्रिल रोजी सायंकाळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीमध्ये ब्यांजो , हालगी ताफा, घोड्याचा डांस यामुळे चांगलीच रंगत आली होती. गावकऱ्यांनी नाचून मनमुराद आनंद लुटला.
मेजर देवीदास पाखरे यांनी स्वखर्चाने सर्व साधारण पाचशे लोकांना आंन्नदान केले.संपूर्ण जयंतीचा कार्यक्रम बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
जयंती उत्सव पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य भागवत कदम, माजी सरपंच संदीप मारकड ,उत्तरेश्र्वर कदम,विकास कदम, राजू शिंदे,बापु काशीनाथ कदम, आबा कदम, रमेश कदम,मौला शेख, रामहरी पाखरे, राजू पाखरे, विठ्ठल चांदणे, मेजर देवीदास पाखरे,राजू जगन्नाथ कदम, संतोष कदम, नितीन कदम, लक्ष्मण शिंदे, आजीनाथ भोसले, श्रीकांत मारकड, बाळासाहेब मारकड , आमोल भोसले, दासा गायकवाड, बापु शिंदे,बालाजी मारकड, सदा कदम, सूर्यकांत कदम, दत्तू प्रल्हाद कदम, पप्पू विश्र्वनाथ कदम, दादा दत्तू कदम,लखन सुनील कदम, भिवा कदम, विक्राम कदम, लिंबा कदम,परसु अर्जुन कदम,बापू दिनकर कदम, सुरज उघडे,बाळासाहेब कदम ,परसू कदम,बाळूचौधरी, दासा बदे,लक्ष्मण कदम या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.अशा प्रकारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here