इंदापुर: विविध कार्यकारी सोसायटी ही ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवस्थेचा आर्थिक कणा मानला जातो. या सेवा सहकारी संस्थेमधून अनेक शेतकऱ्यांच्या कामासाठी पतपुरवठा करणे व शेतकऱ्याची आर्थिक उंची वाढवणे हा मुख्यत्वे करून विविध कार्यकारी सोसायटी चा उद्देश असतो. सद्य परिस्थितीमध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यामध्ये युवकांचा सहभाग हा वाढलेला दिसून येत आहे कारण इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नंबर एक मधील गलांडवाडी नंबर 1 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित गलांडवाडी नं 1 ता. इंदापूर जि. पुणे या संस्थेची सन 2021 -22 ते 2026 -27 या कालावधीत करता संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली असून दि 15/02/2022 रोजी चेअरमनपदी श्री विकास पांडुरंग गलांडे व व्हाईस चेअरमन पदी श्री हरिदास महादेव जाधव यांची बिनविरोध निवड झाली सदर निवडणूक प्रक्रिया पार पाडणे कामी मा.सहकार व संसदीय कार्यमंत्री मा. श्री हर्षवर्धनजी पाटीलसाहेब, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. श्री आप्पासाहेब जगदाळे साहेब, यांचे व मा. दीपक भाऊ जाधव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री पांडुरंग बाबुराव गलांडे, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी कारखान्याचे माजी संचालक श्री पांडुरंग मारुती गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली त्यावेळी शिक्षक पतसंस्था चेअरमन वसंत फलफले, रामेश्वर उत्तम गलांडे वालचंद जावळे सतीश अंकुश फलफले बाबुराव पाडुळे संतोष सुखदेव गलांडे, अंकुश सुखदेव गलांडे, भगवान कचरे, भागवत बोडके, तानाजी भोईटे हे उपस्थित होते.
सदर निवडणूक प्रक्रिया पार पाडणे कामे सर्व सभासद सहकारी संस्था निवडणूक अधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले
संचालक मंडळ
1)श्री विकास पांडुरंग गलांडे चेअरमन
2)श्री हरिदास महादेव जाधव व्हाईस चेअरमन
3)श्री पांडुरंग बाबुराव गलांडे संचालक
4)श्री विकास किसन फलफले संचालक
5)श्री तानाजी भिकू कचरे संचालक
6)श्री श्रीरंग अर्जुन फलफले संचालक
7)श्री सुदाम गोरख गोरे संचालक
8)श्री उत्तम तानाजी जाधव संचालक
9)सौ सुनीता तानाजी भोईटे संचालिका
10)श्री सागर किसन सूळ संचालक
11)श्री अंगत सदाशिव गार्डे संचालक
12)सौ प्रियंका स्वप्निल इंगुले संचालिका
13)सौ ज्योती भगवान मोरे संचालिकाया निवडीनंतर माध्यमांशी बोलताना नूतन चेअरमन विकास गलांडे म्हणाली की गलांडवाडी नंबर १ विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था च्या मार्फत शेतकऱ्याची शेती पूरक आर्थिक उन्नती करणे व संस्था आणि शेतकरी यांच्यातील सकारात्मक दुवा बनणे हाच माझा मुख्य हेतू असल्याचे विकास गलांडे यांनी सांगितले. त्यांच्या या निवडीबद्दल तालुक्यातील अनेक युवक वर्गातून समाधान व्यक्त केले जात असून अनेकांनी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केलेला असल्याचे दिसून येते.