लाचलुचपत विभागाकडून लाच घेणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करून कारवाई केल्याचे अनेक प्रकार आपण वाचले आहेत.तरीही आठवड्यातून एक दोन वेळा अशा प्रकारच्या बातम्या आपल्याला वाचायला मिळतातच.असाच एक प्रकार पुण्यात घडला आहे.तक्रार अर्जात मदत करून अडकलेले पैसे काढून देण्यासाठी पन्नास हजाराच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारताना हडपसर पोलिस ठाण्यातील एका पोलिस उपनिरीक्षकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.सागर दिलीप पोमण ( वय-34) असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाच्या नाव आहे.तक्रारदार यांचे तक्रारी अर्जामध्ये मदत करण्यासाठी आणि तक्रारदार यांचे आर्थिक व्यवहारांमध्ये अडकलेले पैसे परत मिळवून देण्यासाठी पोलिस उपनिरीक्षकाने त्यांच्याकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी करून ती कोरेगाव पार्क येथेल एका हॉटेलमध्ये स्वीकारले. त्यावेळी साध्या वेशात सापळा लावलेल्या लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहात पकडले.
Home Uncategorized 50 हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपत विभागाच्या ताब्यात. साध्या वेशात सापळा...