भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

खान्देश माळी मंडळ पुणे , चाकण च्या वतीने शिक्षण क्रांती च्या जनक ज्ञानज्योति आई सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.यावेळी श्री मनोज गुंजाळ म्हणाले की,आपल्या भारतात असे अनेक लोक झाले आहेत, जे आजही आदरास पात्र आहेत. त्यांनी आपल्या भारतासाठी आणि भारतातील लोकांसाठी अशी अनेक कामे केली आहेत, ज्यामुळे आज लोकांना त्यांचे हक्क मिळत आहेत. म्हणूनच अशा लोकांचा आदर केला पाहिजे.याच कार्यक्रमात ज्ञानदेव शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी विभाग पुणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणाले की सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला.  त्यांचा जन्म महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबात झाला.  सावित्रीबाईंच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे आणि आईचे नाव लक्ष्मीबाई होते.  यासोबतच सावित्रीबाई या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या आणि त्या कवयित्री आणि समाजसेविकाही होत्या. त्यांचा आदर्श भारतातील सर्व स्त्रियांनी घ्यावा असे ज्ञानदेव जी शिंदे म्हणाले.
जयंतीनिमित्त उपस्थित मा श्री मनोज गुंजाळ राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित, मा श्री ज्ञानदेव शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी विभाग पुणे जिल्हा उपाध्यक्ष, खान्देश माळी मंडळ पुणे, शाखा चाकण, अध्यक्ष मा श्री कांतीलाल माळी सर , उपाध्यक्ष मा श्री नितिन माळी साहेब, मा श्री नावनाथ भुजबळ, मा श्री सागर तरटे, रवींद्र माळी, संतोष माळी आणि तसेच सौ. दिनेश्वरी माळी, नूतन लोंढे, अश्विनी मानमोडे, उषा पाटील, लता सोनवणे, शुभांगी तरटे, सुलोचना मानकर असंख्य बंधू भगिनी उपस्थित होत्या.
मा श्री मनोज गुंजाळ यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे बद्दल अतिशय छान मार्गदर्शन केले तसेच मा श्री कांतीलाल माळी सर यांनी प्रास्ताविक केले आणि उपस्थित सर्वांचे आभार मानले

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here