पुण्यात मनसे ला धक्का, धडाकेबाज महिला नेत्या रूपालीताई ठोंबरे यांचा मनसेला रामराम .

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे  तीन दिवसांच्या दौऱ्यावर उद्या पुण्यात येत आहे. पण, त्याआधीच मनसेच्या धडाकेबाज महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे.
रुपाली ठोंबरे यांनी राजीनामा दिल्यामुळे मनसेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. मनसेच्या डॅशिंग नेत्या म्हणून नावलौकिक असलेल्या रुपाली ठोंबरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. रुपाली ठोंबरे यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहून आपला राजीनामा दिला आहे. ‘मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे, असं रुपाली ठोंबरे यांनी स्पष्टपणे पत्रात लिहिलं आहे.तसंच, ‘आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देत. यापुढेही आपले आशीर्वाद आणि “श्री.राज ठाकरे” हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहिल’ अशी भावना व्यक्त करत ठोंबरे यांनी राजीनामा दिला आहे. रुपाली पाटील यांची पुण्यात मनसेच्या आक्रमक नेत्या आणि डॅशिंग नेत्या म्हणून ओळख होती. महिला, युवक-युवतींच्या प्रश्नांवर त्यांनी विशेष कामं केली.
स्थानिक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरील आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यामध्ये त्यांनी तुरुंगवास देखील भोगला आहे. याआधी त्यांनी पुणे महापालिकेत त्या माजी नगरसेविका होत्या. मनसेत प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उपाध्यक्षा आणि पुणे मनसेच्या महिला शहराध्यक्षापदही भुषावले होते.
तसंच पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सुद्धा रुपाली पाटील यांनी लढवली होती. पण, यात त्यांचा पराभव झाला. राज ठाकरे तीन दिवस पुण्याच्या दौऱ्यावर दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यानंतर तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर  येणार आहे. हा दौरा 15 डिसेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान होणार आहे.या दौऱ्यात राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांबरोबर वैयक्तिक पातळीवर संवाद साधून त्यांचे मत जाणून घेणार आहे.त्याच बरोबर येणाऱ्या निवडणुकीची रणनीती या दौऱ्यात ठरवण्यात येणार आहे.  

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here