इंदापूर:जगातील पहिला महाकाव्य ग्रंथ ,ज्यांची लवकरच ग्रिनीज बुकात नोंद होईल असा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर महामानव हा महाकाव्यग्रंथ प्रकाशित झाला आहे.यामध्ये २०२१ कवींच्या २०२१ कविता प्रकाशित झालेल्या आहेत.
याचे संपादन प्रा.अशोककुमार दवणे यानी केले आहे.शब्दादान प्रकाशन,नांदेड यांनी हा ग्रंथ प्रकाशित केले आहे. सदर ग्रंथामध्ये इंदापूर चे कवि रविंद्र चव्हाण आणि वालचंदनगरचे ऍड.संजय चंदनशिवे व सुभाष वाघमारे या तिघांच्या कविता या काव्यग्रथांमध्ये प्रकाशित झालेल्या आहेत.
सदर महाकाव्यग्रंथ इंदापूर मध्ये आल्यानंतर जेतवन बुध्द विहार ,आंबेडकर नगर येथे रविंद्र चव्हाण यांच्या मातोश्री शंकुतला विष्णू चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी रविंद्र चव्हाण आणि ऍड. संजय चंदनशिवे यांनी आपापल्या कवितांचे वाचन उपस्थितांसमोर केले.यावेळी कवी रविंद्र चव्हाण,कवी ऍड.संजय चंदनशिवे, बौध्द महासभेचे तालुकाध्यक्ष प्रा.जीवन सरवदे,सरचिटणीस प्रा.श्रीनिवास शिंदे,महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुहास मोरे,शिक्षक सोसायटी चे मा.सभापती सुनिल मखरे,प्रा.धनंजय भोसले,ऍड.किरण लोंढे ,प्रा.सुहास मखरे,विजयकुमार धेंडे सर उपस्थित होते.
यावेळी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया प्रकाशित धम्मयान मासिकाचे वितरण करण्यात आले.