इंदापूर :गेल्या काही महिन्यापासून पोलीस निरीक्षक मुजावर यांनी इंदापूर पोलिस स्टेशनची जबाबदारी स्वीकारल्यानंतर इंदापूर पोलीस स्टेशनच्या गुन्हेगारीमध्ये चोरी व इतर सर्व प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये कमालीची घट दिसून येत आहे याचे मुख्य कारण पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यात सर्वात जास्त धडाक्याने पेट्रोलिंगचे कार्य दिवस-रात्र निरंतर चालू आहे यातच आता कोरोना व ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कडक निर्बंध लावले आहेत. इंदापुरात सध्या रात्रीची जमावबंदी सुरू आहे.
त्यात ‘थर्टी फर्स्ट’ आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गर्दी व हुल्लडबाजी टाळण्यासाठी ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करताना नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे. हुल्लडबाजी, फटाक्यांची आतषबाजी, पुंगळ्या काढून दुचाकी पळवणे, महिलांची छेडछाड आणि ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह करणाऱयांना रात्र पोलीस कोठडीत काढवी लागणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस निरीक्षक तयुब मुजावर यांनी दिला आहे.नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. मात्र, कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही, त्यामुळे राज्य शासनाने रात्री जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. रात्री 9 ते सकाळी 10 वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास फिरण्यास मनाई आहे.
३१ डिसेंबरच्या जल्लोषी पाटर्य़ांना मनाई करण्यात आली आहे. हॉटेल, डायनिंग हॉल, बार यांना गर्दी टाळण्याचे नियम लावले आहेत. उद्यानातही गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर म्हणाले की इंदापुरात जमा बंदी असल्याने रस्ते, बस सार्वजनिक ठिकाणे,हॉटेलं तसेच गर्दीच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला असून नागरिकांनी घराबाहेर न पडता घरातूनच नवीन वर्षाचे स्वागत करावे.
भर कडाक्याच्या थंडीत चौका-चौकात कर्तव्यदक्ष पोलीस हे नागरिकांच्या सुरक्षेते करता थांबत आहेत हे प्रखरतेने दिसून आले.