माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व भरत शहा हे दोन मित्र पुन्हा एकत्र..इंदापूर कारखाना निवडणूक प्रक्रियेत अर्ज दाखल. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह.

इंदापुर:महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री यांचे अनेक दशकापासून पक्के मित्र असणारे इंदापूर शहरातील वजनदार नेतृत्व भरत शेठ शहा यांनी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाचा फॉर्म भरून पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील यांच्या बरोबर दिलजमाई केली आहे .इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक भरत शहा यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा काही कारणास्तव तडकाफडकी राजीनामा दिला होता. मात्र हा राजीनामा काही गोष्टींच्या नाराजी वरून दिल्याचे चर्चासत्र इंदापूर तालुक्यामध्ये सुरू होते. आजच्या फॉर्म भरण्याच्या निमित्ताने अनेक दिवसापासून एकत्र नसलेले सर्व कार्यकर्ते एकत्र आल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

परंतु कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी पाटील व शहा कुटुंबामध्ये अखेर दिलजमाई झाली असून भरत शहा यांनी शुक्रवारी (दि. 24) सप्टेंबर रोजी दुपारी 2.32 वाजण्याच्या दरम्यान ऊस उत्पादक गट इंदापूर या गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
इंदापूरचे तहसीलदार व सहाय्यक निर्णय निवडणूक अधिकारी श्रीकांत पाटील, सहाय्यक निबंधक जिजाबा गावडे, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी अर्ज स्वीकारला.
काही दिवसापासून इंदापूर तालुक्यात शहा कुटुंब व पाटील कुटुंब हे दुरावल्याचे दिसून आले होते परंतु आता पुन्हा एकदा हे एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. येणाऱ्या काही महिन्यात इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीतही हे दोघे एकत्र येऊन एक हाती भाजपा सत्ता घेतील असा आता विश्वास भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला दिसून येतो.आज खूप दिवसातून उदयसिंह पाटील, मयुर पाटील,भरत शेठ शहा, मुकुंद शेठ शहा,अंगद शहा,महेंद्र दादा रेडके,प्रमोद राऊत,सागर गानबोटे इत्यादी एकत्र येऊन गप्पा  चालू होत्या.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अँड.शरद जामदार, भाजपा इंदापूर शहराध्यक्ष शकील भाई सय्यद, अँड. कृष्णाजी यादव, मुकुंद शहा,माऊली चवरे, माजी सभापती बाळासाहेब पाटील, गोरख शिंदे,सुनील तळेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.



 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here