जनता एक्सप्रेस प्रतिनिधी: नसीर बागवान.
कुर्डुवाडी: कोरोना महामारीनंतर महाराष्ट्रात प्रथमच पंढरपूर यात्रा निमित्त महाराष्ट्रातून दिंड्या अतिशय उत्साहात निघालेल्या आहेत आज ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मुक्काम बरड येथे असून संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी इंदापूर येथे मुक्कामास आहे. कुर्डूवाडी शहरांमध्ये सुद्धा सर्व पालख्यांचे स्वागत अतिशय हर्ष-उल्हासात करण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालू आहे. कुर्डूवाडीमध्ये विठ्ठल ट्रस्ट त्याचप्रमाणे शिवसेना प्रणित नवरात्र मित्र मंडळ, युवक गणेश मंडळ, श्री संत सेवा मंडळ व्यापारी असोसिएशन यांच्यामार्फत गेल्या अनेक वर्ष भगवानगड व नारायणगड या दोन्ही दिंड्यांचे स्वागत व व्यवस्थापन केले जाते परंतु कोरोनाच्या काळात दोन वर्ष या दिंड्या बंद होत्या आणि आता भगवानगड व नारायणगड ट्रस्टने विठ्ठल ट्रस्टचे अध्यक्ष जयंत करंदीकर यांना पत्र लिहून यावर्षी पालखी येणार आहेत असा निरोप दिला व कुर्डूवाडीकर त्यांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहेत. दोन वर्षानंतर बुधवार दि 6 जुलै रोजी कुर्डूवाडीत रिंगण सोहळा होणार असून भजन आणि कीर्तनाने अवघी कुर्डवाडी भक्तिमय आहे.त्यामुळे कुर्डूवाडी व पंचक्रोशीतील तमाम विठ्ठल भक्तांना आनंद व उत्साह आल्याचे दिसून येत आहे. त्यातच दोन वर्षानंतर भगवानगड व नारायणगड दिंड्या कुर्डूवाडी मध्ये येणार असल्याने या दिंडींच्या सेवा करण्यासाठी, भोजन व्यवस्थापन करण्यासाठी व स्वागतासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे संतोष घाडगे व संतोष शेंडे यांनी आवाहन केले आहे.
Home कुर्डुवाडी 2 वर्षानंतर 6 जुलै रोजी भगवानगड व नारायणगड दिंड्यांचे कुर्डूवाडीत होणार रिंगण,दिंड्यांच्या...