2 वर्षांपूर्वीचे अतिवृष्टीतील नुकसान भरपाई 3 कोटी 38 लाखाच्या मागणीचा मंत्रालयात प्रस्ताव दाखल. प्रभाकर देशमुख यांच्या जनहित शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश

जिल्हाधिकार्‍यांनी घेतली प्रभाकर देशमुख यांच्या मागणीची दखल

मोहोळ: राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोहोळ तालुक्यातील पेनुर पाटकुल खंडाळी व कोण्हेरी येथील दोन वर्षापूर्वी अतिवृष्टी मध्ये झालेल्या पिकांची व बागांची नुकसानीची भरपाई त्वरीत शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करा तसेच सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या द्राक्षांची व डाळिंबाच्या नुकसानीचे पंचनामे करा बार्शी तालुक्यातील वैराग व इतर सर्कल मधील चार मंडळ मधील पिकांची व बागांचे पंचनामे झाले आहेत परंतु अद्याप नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावर जमा नाही तसेच रेगुलर कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडीने दोन वर्षापूर्वी जाहीर केलेले 50 हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा करावेत या मागण्यांसाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 23 रोजी वार गुरुवारी आंदोलन करण्यात आले होते त्या आंदोलनाची दखल माननीय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब यांनी घेऊन जिल्हा नियोजन मंडळ ऑफिस मध्ये बैठक लावली व त्या बैठकीमध्ये प्रभाकर देशमुख यांना सांगितले की पेनुर पाटकुल खंडाळी कोन्हेरी येथील दोन वर्षापूर्वी पिकांचे व फळ बागांचे नुकसान झाले होते त्या नुकसानभरपाईसाठी तीन ते साडेतीन कोटीचा प्रस्ताव आपल्या मागणीचे निवेदनाच्या अनुषंगाने मंत्रालयात प्रस्ताव दाखल केलेला आहे व इतर मागण्यांबाबत मंत्रालयात बैठक लावण्याबाबत आम्ही लेखी पत्र पाठवून मागणी करीत आहोत अशी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब बैठकीत बोलताना प्रभाकर देशमुख यांना सांगितले अशी माहिती देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितली तसेच पत्रकारांशी बोलताना देशमुख पुढे म्हणाले ही महा विकास आघाडी हे डोळे असून आंधळ्याची व कान आसुन बहिऱ्याची भूमिका घेत आहेत शेतकरी अक्षरशा अशा अनेक समस्यांनी ग्रासले आहेत याबाबत महाविकास आघडी ला त्याचं काही देणेघेणे वाटत नाही पेनुर पाटकुल खंडाळी व कोण्हेरी या गावचे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळावी म्हणून विविध प्रकारची मोहोळ तहसील समोर आंदोलने केली होती यावेळी धरणे आंदोलनामध्ये युवक जिल्हाध्यक्ष नाना मोरे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत निकम हरिभाऊ लोंढे निसार पाटील दत्ता गायवाले बिरुदेव मोठे बारीकराव काळे अरविंद काळे पाटकुलचे उपसरपंच गणेश नामदे गोविंद सातपुते प्रकाश काटे सिद्राम वाघमोडे गणेश डोंगरे सुखदेव घोडके जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष पवार अजित वाघमोडे नितीन जरग संदीप जरग दत्ता मुळे सर इत्यादी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते या वेळी पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here