इंदापूर तालुक्यातील ॲम्बिशिअस इन्स्टिट्यूट आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमात ॲम्बिशिअस इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थी आरती ओसवाल आणि आकाश कापसे यांचा सी.ए. परीक्षा पास झाले बद्दल सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूर मधील सी.ए. सुनील नरुटे हे लाभले होते. सी.ए. सारखी परिक्षा असो किंवा कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर जीद्द आणि चिकाटी असावी असे ते म्हणाले. प्रा.प्रशांत बंगाळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की आजच्या तरुणांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता स्वामी विवेकानंदांचा आणि जिजाऊं चा आदर्श घेऊन भारतासाठी कार्य करावे.तसेच व्याख्याते म्हणुन अभिनव प्रज्ञाशोध परिक्षा चे सलमान शेख लाभले होते.त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील शिकागो तील भाषण सांगुन आपला भारत कसा महान आहे यावर व्याख्यान देऊन उपस्थितांची मने जिंकली.नुकतीच सीए ची परिक्षा उत्तीर्ण झालेल्या आरती ओसवाल आणि आकाश कापसे यांनी आपला सीए शिक्षणाचा अनुभव सांगुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच या कार्यक्रमात कोमल माने, पायल राऊत तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद युवा सप्ताहाचे जिल्हा प्रमुख ओमकार तावरे यांनी भाषण करुन आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी या युवा सप्ताह मध्ये ॲम्बिशिअस इन्स्टिट्यूट मध्ये मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे तरी विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी परिषदेचे रुतुजा शिंदे हिने केले.सुत्रसंचलन कोमल माने हिने केले.तर आभार पायल राऊत हिने मानले.या कार्यक्रमाला प्रा. मोनाली बंगाळे, गणेश राऊत उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. मोनाली बंगाळे, पुनम भोंग, साक्षी गांधी, पुजा हराळे यांनी परिश्रम घेतले.