मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या संवर्धन आणि जतन साठीच्या आरखाद्यास आजच्या आज तांत्रिक मान्यता देण्यात संबंधीच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना…आमदार दत्तात्रय भरणे यांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांची आजच टेंडर काढणार असल्याची माहिती दिली.
पुणे: आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. अजितदादा पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक नियोजन समितीची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे पार पडली. यावेळी माजी राज्यमंत्री आणि इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी इंदापूर शहरातील ऐतिहासिक वीरश्री सरदार मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या संवर्धन व जतनच्या आरखाद्यास तांत्रिक मान्यता देण्याची विनंती उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्याकडे केली. यावेळी मा. अजितदादा पवार यांनी त्वरित जिल्हाधिकारी यांना तांत्रिक मान्यता देऊन निविदा करण्यासंदर्भाच्या सूचना केल्या. यावर जिल्हाधिकारी यांनी आजच निविदा तयार करणार असल्याची माहिती पालकमंत्री मा. अजितदादा पवार यांनी दिली. तसेच यावेळी आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील शाळांमधील वर्ग खोल्याच्या दुरवस्था बाबत मा. पालकमंत्री अजितदादा पवार यांच लक्ष वेधून वर्ग खोल्या दुरुस्ती करण्यासाठी मागणीही केली.
Home Uncategorized मालोजीराजे भोसले गढी संवर्धन संदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तांत्रिक मान्यता...