धडाका सुरू.. कांदलगाव तरटगावासाठी तब्बल 11 कोटी 92 लाखाचा निधी, शुक्रवारी होणार उद्घाटने व जाहीर सभा

इंदापूर- इंदापूर तालुक्‍यातील कांदलगाव तरटगाव या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 11 कोटी 92 लाख रकमेची विविध विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत.या कामांचे भूमिपूजन माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार (दि. १२) सायंकाळी ६ वाजता करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे याच दिवशी कांदलगाव येथे जाहीर सभा सुद्धा होणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत आबा कोकाटे यांनी दिली.या माध्यमातून या भागातील उपेक्षित रखडलेली कामे मार्गी लागली आहेत त्याचप्रमाणे रस्ते सुद्धा आता चांगल्या दर्जाची तयार होऊन याचा फायदा या दोन्ही गावांना होणार आहे.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर मामा भरणे,माजी सदस्य प्रतापराव पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे,माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत भैय्या तांबिले, माजी पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे,कार्याध्यक्ष अतुल झगडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, नितीन दादा जगताप, संजय सोनवणे, सुरेश शिंदे सर इत्यादी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभणार आहेत. तसेच संजय नाना तांबिले, शुभम निंबाळकर, हेमंत आबा पाटील ,बाळासाहेब व्यवहारे ,बाळासाहेब ढवळे ,रमेश शिंदे,स्वप्निल सावंत,पोपट शिंदे ,अमर गाडे,नानासाहेब नरूटे, संजय देवकर,दिलीप पाटील ,सिताराम जानकर ,सचिन खामगळ, हामा पाटील, नाना गवळी, सुनीता निकम ,रसिका आरडे,सिद्धेश्वर खराडे ,लक्ष्मण रेडके ,सुभाष गायकवाड,आदित्य शिंदे,अनंता ननवरे,काका खबाले,बाळासाहेब पांढरे,विद्यासागर घोगरे, सोमा जावळे, गणेश शिंगाडे, आबा देवकाते, समाधान देवकर, अशोक गवळी, प्रकाश निकम, विठ्ठल महाडिक, सुभाष डरंगे,हनुमंत चित्राव,नवनाथ खबाले,शरद पाटील, नागेश शिंदे, ह भ प लालासाहेब चोपडे ,कैलास देवकर ,शिवाजी जगताप, मनोहर भोसले, अण्णा साळुंखे, विजय काटे ,दिनेश शिंदे ,सतीश चित्राव ,विजय मामा शिद, दत्ता देवकर, विष्णू पाटील, हनुमंत जामदाडे नवनाथ मगर संभाजी टिपाले महाराज, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन हे समस्त ग्रामस्थ कांदलगाव आणि तरटगाव यांच्याकडून होणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष हनुमंत आबा कोकाटे यांनी दिली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here