मंगळवेढा:देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. हर घर तिरंगा हा उपक्रम राबवून ज्या क्रांतिकारकांनी या देशासाठी बलिदान दिलं त्याचं खऱ्या अर्थानं आपण गौरव केला असे मला वाटत.
पण हे करत असताना आजही ग्रामीण भागातील लोकांपर्यंत शासकीय योजनेचा लाभ आपल्याला देता आला नाही याची मला खंत वाटते. आजही पाणी,वीज तसेच आरोग्य सुविधा हा गंभीर प्रश्न आहे.बऱ्याच कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत त्यामुळे त्याचा त्रास नागरिक व इतर कर्मचाऱ्यांना होतो आहे.तसेच
आजही गावातील नागरिकांना / ग्रामस्थांना ग्रामपंचायत कडून कोणता लाभ घेता येतो याची माहिती नाही त्यामुळे या योजनांचा लाभ त्यांना घेता येत नाही. ग्रामपंचायत कडून 101 योजना आहेत पण माहीती अभावी तसेच डिजिटल बोर्ड ग्रामपंचायत मध्ये नसल्यामुळे लोकांना माहीत होत नाहीत. लोकांना फक्त ग्रामपंचायत मधून घरकुल मिळते एवढंच माहित आहे त्यामुळे हे डिजिटल फलक लावण्यात आले पाहिजेत. हर घरापर्यंत शासकीय योजनेचा लाभ कसा देता येईल यासाठी सीओ साहेबांनी विचार केला पाहिजे.
महात्मा गांधीजी यांनी खेड्याकडे चला असा संदेश दिला होता पण जर स्वातंत्र्यानंतर 75 वर्षे झाली तरी लोकांना शासकीय योजनांची माहीती होत नसेल तर याचा विचार आपण केला पाहिजे असे मत प्रहारचे तालुका अधक्ष राजकुमार स्वामी यांनी व्यक्त केले आहे.
पुढे ते म्हणाले की,माझ्या भागातील सर्व सामान्य नागरिकांना ग्रामस्थांना कशा पद्धतीने शासकीय योजनांचा लाभ देता येईल यासाठी सीओ साहेबांनी प्रयत्न केला पाहिजे.आज जवळ जवळ दोन ते अडीच महिने झाले आम्ही डिजिटल फलक लावण्यात यावे यासाठी लेखी व तोंडी मागणी करत असताना आज पर्यंत आम्हाला या संदर्भात गटविकास अधिकारी यांच्या कडून प्रतिसाद मिळाला नाही.जर येत्या 12 ऑगस्ट पर्यंत फलक लावण्यात आले नाहीत तर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ मस्के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर बोंबा बोंब आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षा कडून देण्यात आला.