इंदापूर: इंदापूर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या कामाचा धडाका सध्या जोरात चालू आहे. गेल्या काही दिवसापूर्वी त्यांच्याच नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात अवैधरित्या चालवलेला गांजा पकडला होता, परवा अफूच्या शेती संबंधित शेतकऱ्यांवर कारवाई केली होती. इंदापूर पोलीस स्टेशनचा आणखी एक पराक्रम समोर आला आहे. इंदापूर पोलीस स्टेशनने अवघ्या चार तासात चोरीला गेलेले लाखो रुपयांचे दागिने शोधून गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळण्यात त्यांना यश आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नुकतेच फिर्यादी अशोक अंकुश व्यवहारे वय 43 ( रा.क्षिरसागरवस्ती माळवाडी नंबर 1 ता.इंदापुर) यांनी या बाबत गुन्हा दाखल केला होता. आपल्या राहत्या घरातील साडे सतरा तोळे सोन्याचे दागिणे कोणीतरी चोरून नेले आहेत अशी फिर्याद इंदापूर पोलीस स्टेशनला त्यांनी दिली होती.सदर घटनेचे गांभिर्य ओळखून इंदापुर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सखोल तपास व शोध पथकांना सदर गुन्हयाचा तपास करण्याबाबत मार्गदर्शन केले.त्यानुसार गुन्हे शोध पथकाने पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या सुचनेप्रमाणे वेगवेगळे तर्क-वितर्क वापरून व तांत्रीक विश्लेषण करून सखोल तपास केला.
आणि अखेर पोलीस पथकाला हा गुन्हा कोणी केला हे शोधण्यास यश मिळाले. सदरची संपूर्ण तपासणी झाल्यानंतर सदर गुन्हयात दोन आरोपी पकडण्यात आले. 01) सागर अरुण राउत वय 20 रा.टेंभुर्णी कोष्टी गल्ली ता.इंदापुर तर 02) दादा बळी शेंडगे वय 21 रा.साठेनगर ता.इंदापुर जि.पुणे यांचेकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आणि त्यांचे कडुन सदर गुन्हयातील गेलेले तब्बल 8,75,000 रुपये किंमतीचे साडे सतरा तोळे सोन्याचे दागिणे हस्तगत करुन चोरीचा गुन्हा 4 तासात उघडकीस आणला आहे.
इंदापुर पोलीस ठाणे येथे गु र नं 298/2023 भादवि कलम 454,457,380 नुसार आरोपींना सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. मा.न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी रिमांड दिले आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे षोध पथक प्रमुख सहा.पोलिस निरीक्षक पवार हे करित आहेत. सदरची कामगिरी मा. मा.पोलीस अधिक्षक,पुणे ग्रामिण श्री.अंकित गोयल,अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप पवार,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाष पवार,पोलीस हवालदार प्रकाष माने,पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव,पोलीस नाईक सलमान खान पोलीस नाईक लखन साळवे पोलीस अंमलदार नंदु जाधव, विनोद लोंखंडे ,लक्ष्मण सूर्यवंशी व महीला पो हवा खंडागळे या पथकाने केली आहेे.
Home Uncategorized शाब्बास इंदापुर पोलीस..! पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी…चोरीस गेलेले साडे सतरा तोळा सोन्याचे...