होळीच्या पवित्र अग्नीमध्ये मतभेद,मत्सर,द्वेष,आळस आणि व्यसन दहन होवो- आमदार दत्तात्रय भरणे.

इंदापूर: इंदापूर तालुक्यातील लोकप्रिय आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील जनतेला आज होळीनिमित्त खास शुभेच्छा दिल्या. या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये मत्सर,द्वेष, मतभेद त्याचप्रमाणे आळस आणि व्यसन हे होळीच्या पवित्र अग्नीमध्ये दहन होवो अशा अनोख्या शुभेच्छा आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.
ते पुढे म्हणाले की,”होळी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण असून एक चांगली संधी समजून आज होळीच्या दिवशी एकमेकांबद्दलचा राग, द्वेष तसेच वाईट गोष्टींची या होळीत आहुती दिली जाते.निसर्गाच्या कालचक्र नुसार अनेक सण उत्सव साजरे केले जातात परंतु शास्त्रीय दृष्ट्या सणाला ज्यादा महत्त्व आहे. त्यामुळे हा सण सर्वांनी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करा.”असेही आवाहन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.इंदापूर तालुक्यात भरघोस पद्धतीने विकासगंगा आणलेले भरणे मामा हे कोणताही सण असो वा सार्वजनिक कार्यक्रम आपल्या अनोख्या शैलीमुळे ते नेहमीच चर्चेत असतात.आणि त्यातच अशा अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देऊन भरणेमामांनी आपली वेगळेपण पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here