भारताचा स्टार क्रिकेटपटू शिवम दुबे ०५ फेब्रुवारीला इंदापूरात-ग्रामदैवत इंद्रेश्वर चषक नाईट टेनिस बाॅल स्पर्धेची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात.

👉 कै.डॉ.लालासाहेब रामचंद कदम यांच्या स्मरणार्थ भव्य क्रिकेट स्पर्धा
इंदापूर :- इंदापूर नगरपालिका मैदान नवीन कचेरी १०० फुटी रोड येथे ग्रामदैवत इंद्रेश्वर चषक – २०२३ भव्य नाईट टेनिस बाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेचे हे पाचवी वर्ष आहे. दि.०१/०२/२०२३ पासुन या नाईट टेनिस बॉल स्पर्धा सुरू असून दि. ०५/०२/२०२३ पर्यंत क्रिकेट मॅच खेळवल्या जाणार आहेत. दि. ०५/०२/२०२३ रोजी भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू शिवम दुबे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. यापूर्वी भरवलेल्या स्पर्धा या अत्यंत यशस्वी पद्धतीने पार पडल्या होत्या व या स्पर्धा पाहण्यासाठी भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन,स्फोटक फलंदाज युसुफ पठाण यासारखे दिग्गज नेत्यांची उपस्थिती सुद्धा लाभलेली होती म्हणून यावर्षीच्या स्पर्धा कधी चालू होणार याकडे तालुक्याचेच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. परंतु आता या चाहत्यांची प्रतीक्षा संपण्याच्या मार्गावर असून लवकरच या स्पर्धेत चालू होणार आहेत.
इंदापूर नगरषरीषदेचे मा. नगरसेवक, विरोधी पक्षनेते पोपट शिंदे, किरण घाडगे, सतिश तारगांवकर, आणिल (आण्णा)पवार, वसीम शेख, राहूल गुंडेकर, हाजीमस्तान कुरेशी, संजय सानप, संजय (डोनाल्ड) शिंदे. प्रशांत (आण्णा) शिंदे, राजू ताटे, रमेश (आबा) शिंदे, रहिम बागवान, जुबेर पठान, गौस सय्यद, सोहेल बेपारी, शोएब बागवान, अख्तर कुरेशी आणि मॉर्निंग क्रिकेट क्लब, गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब इंदापूर यांचेकडून कै. डॉ. लालासाहेब रामचंद कदम यांच्या स्मरणार्थ ग्रामदैवत इंद्रेश्वर चषक – २०२३ स्पर्धेचे आयोजन केले आहे.
स्पर्धेत प्रथम विजयी संघाला मा. शिवांश प्रशांत कदम यांचेकडून १ लाख ५१ हजार १ रुपये आणि चषक, द्वितीय विजयी संघाला मा भरतशेठ शहा संचालक कर्मयोगी सहकारी साखर कारखाना यांचेकडून १ लाख १ रुपये आणि चषक, तृतीय विजयी संघाला बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव मा. अॅड. राहूलजी मखरे यांचेकडून ५१ हजार १ रुपये तर हॉटेल विसावाचे प्रोपायटर मा. प्रशांत शिंदे यांच्या कडून ५१ हजार १ रुपये असे बक्षिसांचे स्वरूप असून मॅन ऑफ द सिरीज साठी संदिप वशिंबेकर यांचेकडून एल ई डी टिव्ही, फायनल मॅचसाठी राहूल गुंडेकर आणि शोएब बागवान यांचेकडून स्पोर्ट्स सायकल, तर लायन्स स्पोर्ट क्लब कडून बॅट अशी उप बक्षीस जाहीर करण्यात आली आहेत. तर अॅड.आकाश बसाळे यांचेकडून उत्कृष्ट फलंदाज ५ हजार रुपये, महेश पाटील यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज ५ हजार रुपये तर सौरभ शिंदे यांच्या कडून मॅन ऑफ द मॅच फायनलसाठी ५ हजार रुपये अशी वैयक्तिक बक्षिसे जाहीर केली आहेत. अंतिम स्पर्धेसाठी जतिन पटेल यांच्या सौजन्याने डान्सिंग, कॉमेडी अंपायर डी एल रॉक यांना पाचारण करण्यात आले आहे. मांडप डेकोरेशन, लाईट, गॅलरी नातेपुते येथील प्रसिद्ध घुले मांडप आणि डेकोरेटर्स यांनी केले आहे. एकंदरीतच या स्पर्धा म्हणजे क्रिकेट रसिकांसाठी एक वरदान ठरत असून आजपर्यंत झालेल्या स्पर्धा या यशस्वीरित्या पार पडल्या आहेत.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here