निखिल राजन घरत कनिष्ठ महाविद्यालय सफाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा – विभागीय कबड्डी स्पर्धेचे पटकावले उपविजेतेपद

वैभव पाटील : पालघर जिल्हा प्रतिनिधी
दि. 29 डिसेंबर : घाटकोपर मुंबई येथील माणिकलाल मैदान येथे झालेल्या मुंबई विभागीय कबड्डी स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलींच्या गटात सफाळ्याच्या निखिल राजन कनिष्ठ महाविद्यालयाने उपविजेतेपद पटकावत जबरदस्त कामगिरी केली . त्यांनी या स्पर्धेत नवी मुंबई, भिवंडी शहर,ठाणे महानगरपालिका अश्या तुल्यबळ संघांवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. त्यांनतर अटीतटीच्या सामन्यात मुंबई उपनगर संघाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला.मात्र पालघर सारख्या ग्रामीण भागातून येऊन मुंबई स्तरावर हे यश सर्वोत्तम मानले जात आहे.महाविद्यालयाच्या या अगोदरच्या बुद्धिबळ स्पर्धेत राज्यस्तर तसेच मैदानी स्पर्धेतील यशानंतर हे विभागीय उपविजेतेपद शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याच मानलं जातं आहे.या स्पर्धेतील महत्वाची बाब म्हणजे संघाची कर्णधार सोनाली भोईर व संजना भोईर ह्यांची राष्ट्रीय स्तर खेलो इंडिया च्या शिबिरासाठी निवड झाली आहे. पालघर जिल्ह्यासाठी ही अतिशय अभिमानास्पद कामगिरी मानली जात आहे.महाविद्यालयाच्या प्राचार्या मेघा वर्तक, उपप्राचार्य राजन घरत व पर्यवेक्षक विलास पाटील यांनी या कामगिरीचंबद्दल अभिनंदन केला आहे. संघाच्या या यशामध्ये प्रशिक्षक विशाल पाटील, पूजा पाटील तसेच संघ व्यवस्थापक म्हणून अक्षय सत्पाळकर, हेमंत पाटील तसेच तझीन शेख यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. संघाच्या कामगिरीच परिसरासह संपूर्ण पालघर जिल्ह्यात कौतुक होत आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here